महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या राहाता तालुकाध्यक्षपदी विजय खरात


महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या राहाता तालुकाध्यक्षपदी विजय खरात

श्रीरामपूर :-(प्रतिनिधी)शिर्डी  येथील सामाजिक कार्यकर्ते व आर.के. न्यूज चैनल चे प्रतिनिधी तसेच साप्ताहिक राजनीती समाचार चे वार्ताहर विजय शंकर खरात,सावळीविहीर यांची 

महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या राहाता तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याची माहिती पत्रकार संघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष राजमोहंमद शेख यांनी दिली पत्रकार संघाच्या मुख्य कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत श्री. विजय खरात यांची या पदावर नियुक्ती करून पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले श्री. विजय खरात हे पूर्वी दैनिक बहिष्कृत भारत या वृत्तपत्राचे शिर्डी वार्ताहर पदी काम करीत होते. तसेच महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाचे ते गेल्या पंधरा वर्षापासून सभासद आहेत. त्यांच्या उत्कृष्ट सामाजिक कार्याचा व उत्कृष्ट पत्रकारितेचा आढावा घेता शेख बरकत अली यांनी त्यांची निवड केली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल पत्रकार संघाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष शेख बरकत अली, प्रदेश महासचिव शेख फकीर महंमद, प्रदेश उपाध्यक्ष बी.के. सौदागर, प्रदेश कार्याध्यक्ष अमीर जहागीरदार, प्रदेश सचिव किशोर गाढे, अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष अब्दुल्लाभाई चौधरी, अहमदनगर जिल्हा उपाध्यक्ष इद्रीसभाई, संगमनेर तालुकाध्यक्ष दस्तगीर श

शाहा, कोपरगाव तालुकाध्यक्ष अशोक कोपरे, संगमनेर शहराध्यक्ष बेगमपुरे, घाटकोपर शहरध्यक्ष आसिफभाई सय्यद, नाशिक जिल्हाध्यक्ष उस्मान भाई शेख, नासिक जिल्हा कार्याध्यक्ष मनसुरभाई मुलानी,चांदवड तालुकाध्यक्ष सुखदेव केदारे, येवला तालुकाध्यक्ष सूर्यकांत गोसावी, मनमाड शहरध्यक्ष अनिल देवरे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष रियाज खान पठाण, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष विलास पठारे, रायगड जिल्हाध्यक्ष मुदस्सीर पटेल, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष सुभाष गायकवाड, श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष गुलाबभाई शेख, शेवगाव तालुकाध्यक्ष सज्जादभाई पठाण, पुणे जिल्हाध्यक्ष मिलिंद शेंडगे, पुणे जिल्हा सचिव अफजल खान, पुणे शहराध्यक्ष हनिफ भाई तांबोळी, तसेच जावेद भाई शेख, मुरलीधर किंगर,अरुण बागुल, साईनाथ बनकर, अकबरभाई शेख, अमीर बेग मिर्झा, रमेश शिरसाट, राहाता तालुका उपाध्यक्ष शब्बीरभाई कुरेशी, अक्रम कुरेशी आदींनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News