एनयुजे महाराष्ट्रचे नेतृत्वाखाली माध्यमकर्मींचे आंदोलन! पत्रकारांसाठीच्या काळ्या कायद्याचा निषेध


एनयुजे महाराष्ट्रचे नेतृत्वाखाली माध्यमकर्मींचे आंदोलन! पत्रकारांसाठीच्या काळ्या कायद्याचा निषेध

महाराष्ट्रात लागू करू नये,त्यात सुधारणा अत्यावश्यक! पत्रकार रजिस्ट्रेशन, महामंडळ,त्रिपक्षीय समिती,सामुहिक आरोग्य वीमा! आदि मागण्यांसाठी एनयुजेएम मैदानात!

मुंबई : दि ११डिसेंबर रोजी आझाद मैदान मुंबई! येथे राज्याच्या कानाकोपऱ्यातून मात्र कोरोना काळाचे भान राखून मर्यादित संख्येत श्रमिक पत्रकारांठी करण्यात आलेल्या काळ्या कायद्याचा निषेध करण्यात आला! तब्बल चार तास चालू  आसलेल्या  या आदोलनातील हा परिसर दुमदूमला!

या प्रसंगी एनयुजेमहाराष्ट्र अध्यक्ष शीतल करदेकर  यांनी सांगितले की,लोकशाहीचा ४था स्तंभ या कायद्याने वेठबिगार होणार आहे,चौथा स्तंभ नव्हे तर लोकशाहीला संपवण्याचे हे काम आहे,आमचे म्हणजे जनतेच्या लोकशाहीच्या राजाच्या मतावर निवडून आलेल्या सरकार आम्ही आमचे हिताचे काम करण्यास निवडून दिलेय यामचे हक्क काढून घेण्याचा ,जीवघेणे कायदे करण्याचा अधिकार दिलेला नाही.येत्या अधिवेशात महाराष्ट्र सरक्रारने आपली भूमिका जाहीर करावी,आमचे म्हणणे केंद्रापर्यत पोहचवून सुधारणा करवून घ्यावी तोपर्यत हा कायदा महाराष्ट्रात लागू करू नये.तसेच पत्रकारांना न्याय हक्क सन्मान मिळावा म्हणून पत्रकार रजिस्ट्रेशन,पत्रकार महामंडळ,त्रिपक्षीय समिती,सामुहिक आरोग्य वीमा,पत्रकार सन्मान योजना,सुरक्षा कायद्यात सुधारणा  होणे आवश्यक आहे. पत्रकारांसाठी सर्वसमावेशक  निश्चित धोरण या महामंडळ माध्यमातून आखले जावे,आमचेबाबतचे निर्णय इतर ३स्तंभानी परस्पर घेऊ नये,यात आमचा सक्रीय सहभाग महत्वाचा आहे.

येत्या काळात तातडीने मुख्यमंत्र्यांनी आमचेबाबतीत निर्णय करावा अन्यथा आझाद मैदानातून सुरु झालेली ही क्रांतीची ठिणगी सर्वत्र पसरेल.

चिपको आंदोलनाप्रमाणेच आम्ही सच्चे पत्रकार लोकशाहीचा स्तंभ ठासळू न देण्यासाठी आक्रमकपणे आमचे हक्कासाठी लढत राहू, मोठी आंदोलने राज्यभरात होतील!केंद्र सरकारने आणीबाणीपेक्षा भयंकर आणीबाणी आमचे जगण्याचे आणि आमचे हक्कावर अधिकारावर लावली आहे,येत्या काळात  हा वणवा देशभरात पसरेल!असा इशारा करदेकर यांनी दिला.या आंदोलनास  एनयुजेआयच्या कार्यकारिणी सदस्य संजना गांधी ,शिवाजी नलावडे,सुवर्णा दिवेकर,तसेच  सचिन डेरे,शेखर धोगडे,डाँ अब्दूल कादिर,विष्णू कदम,भारत मानकर,अनिल राही,धनंजय ब्रम्हपुरकर,रियाझ देशमुख,सचिन दीक्षित,मनोज तांबे, विशाल गुप्ता,सुनिल कटेकर ,प्रशांत हिंगणे यांची प्रेरक मार्गदर्शनपर भाषणे झाली.

मुंबई, ठाणे, पालघर पुणे ,कोल्हापुर,सातारा,सांगली,रत्नागिरी, सिंधुदुर्ग,नवी मुंबई,जालना, औरंगाबाद, नाशिक ,नगर, हिंगोली, जळगाव,परभणी,सोलापुर आदी जिल्ह्यातून माध्यमकर्मी या आंदोलनात सहभागी झाले होते

यात मोठ्या संख्येने  किल्ले शिवनेरी जुन्नर,खेड, शिरुर,दोंड, पुणे ,औरंगाबादचे अध्यक्ष डाँ  कादीर यांचेसह जिल्हा प्रतिनिधी,ठाणेचे अध्यक्ष योगेश गोडे व उपाध्यक्ष प्रविण वाघमारे यांचेसह जिल्हा प्रतिनिधी,कोल्हापुरचे पत्रकार, कोल्हापुर जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष सामंत,जिल्हा उपाध्यक्ष विनयकुमार पाटील,सचिव शेखर धोंगडे, शिरोळ ता.सचिव मदन गावडे,सल्लागार सुनिल कांबळे रविंद्र कांबळे,तसेच रायगड  उपाधक्ष मनोज भिगांर्डे यांचे मोठे सहकार्य झाले .

पत्रकारांना दुय्यम लेखून डावललं जात आहे .लोकशाहीच्या ४थ्या स्तंभाला संपवण्याचे षंडयंत्राविरोधात एनयुजेमहाराष्ट्र मैदानात उतरले असून आता मागे हटणार नाही.आमचे हक्क मिळेपर्यत ही लढाई सुरु राहिल अशी ठाम भूमिका सहभागी पत्रकारांनी व्यक्त केली.

  या आंदोलनास फोनवर मेसेजद्वारे अनेक सामाजिक संघटना,व्यक्ती ,मंत्र्यांनी,राजकीय  नेत्यानी पाठिबा दिला आहे. खासदार धैर्यशील माने हातकणंगले लोकसभा, माजी खासदार राजू शेट्टी, आमदार राजू आवळे, हातकणंगले विधानसभा माजी आमदार डॉ सुजित मिनचेकर हातकणंगले विधानसभा, माजी आमदार उल्हास पाटील माजी आमदार शिरोळ विधानसभा, ए. वाय.पाटील जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कोल्हापूर, मुरलीधर जाधव शिवसेना जिल्हाप्रमुख कोल्हापूर,,संजय वाघमोडे जिल्हाध्यक्ष यशवंत सेना कोल्हापूर,तेजस कुराडे(देशमुख) शिवसेना शहरप्रमुख जयसिंगपुर, रणजित पटवा प्रदेशाध्यक्ष राणी लक्ष्मीबाई क्रांतिकारी पार्टी मुंबई, सौ.सुजाता सुनिल शास्त्री जिल्हाध्यक्षा उल्हासनगर शहर महिला काँग्रेस कमिटी, सागर प्रकाश घाडगे राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया एम्प्लॉइज युनियन.आदी मान्यवरांनी लिखीत स्वरुपात पाठिंबा दिला. तर मंगलम क्लाउड किचनचे श्रीशभाऊ यांचे सक्रीय सहकार्य लाभले. समस्त पोलीस बंधू भगिनींचे सहकार्य मिळाले.त्यासाठी युनियनने त्यांचे आभार मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News