शेतकऱयांवर केलेल्या वक्तव्यामुळे रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्यास जोडे मारो आंदोलन


शेतकऱयांवर केलेल्या वक्तव्यामुळे रावसाहेब दानवे यांच्या पुतळ्यास जोडे मारो आंदोलन

शिडी,राजेंद्र दूनबळे: प्रतिनिधी

शिवसेना राहाता तालुक्याच्या वतीने शिर्डी नगरपंचायत शेजारी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकन्याना पाकिस्तानी व चीन  चे संबोधल्याच्या निषेधार्थ रावसाहेब दानवे याच्या पुतळयाला जोड़े मारो आदोलन करण्यात आले या प्रसंगी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवलेला होता आणि पुतळा जाळण्याचा प्रयत्न पोलिसानी हाणुन पाडला पोलिसानी शिवसैनिकाना अटक केली आणि वैयक्तिक जामिनावर सुटका केली. याप्रसंगी कमलाकर कोते बोलताना म्हणाले की भाजपा चे नेते व केंद्रिय मत्री रावसाहेब दानवे हे शेतकऱ्यांविषयी असंवेदनशील असल्यामुळे ते शेतकाऱ्यांना पाकिस्तानी आणि चीनी म्हणत आहे. शेतकरी थंडी पावसामध्ये दिल्ली येथे आंदोलन करीत असताना भाजपा शेतक-याची खिल्ली उडवित आहे रावसाहेब दानवे हे दानवे नसुन दानव आहे आणि त्याचा डी एन ए पाकिस्तानी आहे यापुढच्या काळात असे वर्तन केल्यास शिवसेनेच्या वतीने प्रत्यक्ष राबसाहेब दानवे याना जोडे मारण्यात येतील तसेच दानवे याची मंत्रीमंडळातुन हकलपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली याप्रसंगी अनिताताई जगताप, संजय अप्पा शिंदे, अनिल बागरे, विजय जगताप, राहुल गोदकर, सचिन कोते , सजय आहेर, भास्कर मोटकर, सोमनाथ गोरे ,गंगाधर बेंद्रे ,सतोष जोवेकर ,विजय गोल्हार, अतुल चौधरी , किरण जपे, दिनेश आरणे , संदिप बावके, अमोल गायके , दिनेश शिंदे, जयराम कांदळकर ,महेश महाले, हरिराम रहाणे,सुयोग सावकारे,अक्षय तळेकर,दत्ता आसने इ. आणि शिवसेना महिला आघाडीच्या वतीने लक्ष्मीताई आसने कस्तुरीताई मुदलियार सगिताताई जगताप आदी शिवसेनिक उपस्थित होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News