राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक मा.खा.शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या80 व्या वाढदिवसानिमित्त ! !


राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक मा.खा.शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या80 व्या वाढदिवसानिमित्त ! !

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

वर्तमान महाविकास आघाडी सरकारमध्ये सामिल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आज 80 वा वाढदिवस ..💐💐

 मा. शरदचंद्रजी पवारसाहेबांचा जन्म १२ डिसेंबर,१९४० रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती येथे  वडिलांचे नाव गोविंदराव पवार आणि आईचे नाव शारदाबाई पवार आहे.गोविंदराव हे निरा कॅनॉल सहकारी सोसायटीचे बराच् काळ सेक्रेटरी होते.पुढे ते बारामती येथे निघालेल्या सहकारी बँकेचे पहिले व्यवस्थापक झाले.बारामती लोकसभा मतदार संघाच्या विद्यमान खासदार सौ.सुप्रिया सुळे या त्यांच्या सुकन्या आहेत. तर महाराष्ट्र राज्याचे वर्तमान उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार हे त्यांचे पुतणे होय पवारसाहेब यांचे छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे तीन आदर्श आहेत.

इ.स. १९५६ साली ते शाळेत असताना त्यांनी गोवामुक्ती सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला.व तेथून त्यांच्या राजकीय जीवनाची सुरवात झाली.त्यानंतर काँलेजमध्ये असताना विद्यार्थी संघटनेचे नेते म्हणूनही त्यांनी काम पाहिले.विद्यार्थी संघटनेच्या एका समारंभासाठी त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना आमंत्रित केले.पवारांनी त्याप्रसंगी केलेल्या भाषणामुळे यशवंतराव चव्हाण अतिशय प्रभावीत झाले.त्यानंतर चव्हाणांच्या सांगण्यावरून पवारांनी युवक काँग्रेसमध्ये प्रवेश केला. चव्हाणांनी पवारांच्यातील सुप्त नेता हेरला आणि त्यानंतर पवार त्यांचे शिष्य बनले. त्यानंतर चव्हाणांनी त्यांच्या पुणे शहराला दिलेल्या भेटींदरम्यान पवारांना मुद्दाम भेटायला बोलावून त्यांना अनेकवेळी मार्गदर्शन केले. वयाच्या २४ व्या वर्षी ते महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. त्यानंतर यशवंतराव चव्हाणांचा राजकीय वारसदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले.

इ.स. १९६६ साली पवारांना युनेस्को शिष्यवृत्ती मिळाली.त्याअंतर्गत त्यांना पश्चिम जर्मनी, फ्रान्स, इटली, इंग्लंड इत्यादी देशांना भेट देऊन तेथील राजकीय पक्षांचा आणि त्यांच्या पक्षबांधणी करायच्या पद्धतीचा जवळून अभ्यास करता आला.

मा.पवारसाहेब यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत इ.स. १९७८ ते इ.स. १९८०, इ.स. १९८८ ते इ.स. १९९१ व इ.स. १९९३ ते इ.स. १९९५ या कालखंडांदरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद व केंद्रात कृषीमंत्रीपदा सह अनेक मंत्री पदे भूषविले आहेत त्यांनंतर इ.स. १९९९ साली पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे रोपटे लावले होते आज त्याचा वटवृक्ष झाला आहे . अशा जाणता राजास वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा💐💐

जाहिरात
Search
विडिओ
Recent News