सुनिल ज्ञानदेव कदम यांची कोपरगाव तालुका मंडल भारतीय जनता पार्टी सचिवपदी निवड !!


सुनिल ज्ञानदेव कदम यांची कोपरगाव तालुका मंडल भारतीय जनता पार्टी सचिवपदी निवड !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगाव - कुंभारी येथील भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते सुनिल ज्ञानदेव कदम यांची कोपरगाव तालुका मंडल भारतीय जनता पार्टी सचिवपदी नियुक्ती झाली असुन सदर नियुक्तीचे पत्र भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव तसेच माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते देण्यात आले आहे.

 या निवडीबद्दल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे तसेच माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे व कोपरगाव औद्यागिक वसाहतीचे चेअरमन व संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी अभिनंदन करून सुनिल कदम यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

  केद्रांत व राज्यात भारतीय जनता पार्टी देशहिताला सर्वोच्च प्राधान्य देवुन यशस्वीपणे मार्गाक्रमण करत असुन आपण आपल्या संघटन कौशलयाने या पदाच्या माध्यमातुन पक्ष संघटन मजबुत करून कोपरगाव तालुका मंडलात भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरण व विविध योजना समाज्याच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्याचे काम जोमाने कराल अशी अपेक्षा माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे यांनी आपल्या अभिनंदनपर पत्रात व्यक्त केली आहे. या निवडी बद्दल कुंभारी पंचक्रोशीतील नागरीकांनी सुनिल ज्ञानदेव कदम यांचे अभिनंदन केले आहे .

जाहिरात
Search
विडिओ
Recent News