शेवगाव पुरवठा निरीक्षक यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण


शेवगाव पुरवठा निरीक्षक यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

शेवगाव प्रशिक्षणार्थी  पुरवठा अधिकारी पवन बिघोत यांनी शासनाची फसवणूक करून नोकरी मिळवली असल्याचा आरोप करून त्यांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करावे यासाठी अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेवगाव येथील संकेत भाऊसाहेब कळकुंबे हे उपोषणास बसले आहेत,

    ‌‌‌‌ ‌ शेवगाव येथील प्रशिक्षणा पुरवठा अधिकारी पवन बिघोत त्यांच्यावर औरंगाबाद शहरातील सिडको ठाण्याअंतर्गत 419,420,34 याप्रमाणे सप्टेंबर 2016 मध्ये फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल होता, तरीसुद्धा पवन बिघोत हे शासनाची दिशाभूल करून शासकीय नोकरीमध्ये दाखल झाले,शासकीय नोकरी मिळवताना त्यांनी आपली माहिती लपवण्याचा आरोपही कळकुंबे यांनी केला आहे, त्याच प्रमाणे त्यांनी आत्तापर्यंत उचललेल्या शासकीय सोयी सवलती यांचीही भरपाईत्यांच्याकडून करून घ्यावी व त्यांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करावे अशी मागणीही संकेत कळकुंबे यांनी जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे केली आहे,

          शेवगाव चे प्रशिक्षणार्थी पुरवठा निरीक्षक पवन बिघोत हे शेवगावला हजर झाल्यापासून वादग्रस्त ठरत आहेत, त्यांना शासनाच्या अनेक नियमांची आजपर्यंत माहितीही नसल्याने त्यांनी नोकरी करताना अनेक तांत्रिक अडचणींना आमंत्रण दिलेले आहे,

         यावेळी मिनाक्षी कळकुंबे, जिल्हा अध्यक्ष आर पी आय,सुशांत म्हस्के,आर पी आय जिल्हा सरचिटणीस दानिक्ष शेख, संतोष पाडळे उपाध्यक्ष आर पी आय, बाळासाहेब सानप भगवान बाबा महासंघ,आंनद लहामगे उप जिल्हा प्रमुख, सरोज साळवे, प्रदेश अध्यक्ष ख्रिचन सेवा संघ, महाराष्ट्र राज्य,प्रविण नाईक शेवगांव इत्यादी उपोषणकर्ते यावेळी उपोषणस्थळी हजर होते,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News