अनाथ मुलांच्या गालावर हसू येण्यासाठी प्रयत्न केल्याचा,आत्मीय सुखाचा आंनद हा वेगळाच,,,,सागर पगारे


अनाथ मुलांच्या गालावर हसू येण्यासाठी प्रयत्न केल्याचा,आत्मीय सुखाचा आंनद हा  वेगळाच,,,,सागर पगारे

शिर्डी,राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी

जीवन हे जगण्याचे अनेक प्रकार आहे त्यात स्वतः व परिवारा साठी आणि दुसरे म्हणजे दुसऱ्या साठी ,स्वतः साठी सर्वच जगतात पण दुसऱ्यासाठी जगण्याचा आंनद  हा आत्मिक सुख देणारा सर्वात मोठा आंनद असतो,आणि तेही नुकताच पहावयास मिळाला ,कारण होते वाढदिवसाचे,एरवी नको तिथं आपण या दिवशी पेशाची उधळ पट्टी करतो पण सामाजिक कार्यकर्ते ,ग्रामपंचायत सदस्य सागर पगारे यांच्या माध्यमातून भूषण खंडिझोड यांचा वेगळ्या पद्धतीत वाढदिवस साजरा करण्यात आला  आश्रमातील 20ते 25 मुलांना थंडी चे दिवस असल्याने स्वेटर ,देण्यात आले,त्यांना भोजन देण्याचे नियोजन करून आपल्या स्वताच्या हातानी भरविण्यात आले, नवीन स्वेटर मिळाल्याचा मुलांना खूप आंनद झाला,त्यांनी सागर पगारे व त्याच्या सहकारी मित्रांचे आभार मानले यावेळी सागर पगारे म्हणालेकी या कार्यक्रमाची कोणत्याही प्रकारे किंमत होऊ  शकत नाही,आपण जीवन जगत असताना ,संघर्ष मय जीवन काय असते याचा अनुभव आहे परंतु या लहान मुलांच्या सानिध्यात सर्व दुःख,कस्ट, आपण काही काळ का होईना विसरून जातो ,आपणही समाजाचे काही देणं लागतो ,म्हणून हा उपक्रम केला यात मन भरून आलं,इथून पुढे ही या मुलांना काही मदत लागल्यास ती तात्काळ पूर्ण करू असे सागर पगारे यांनी मत वेक्त केले

या प्रसंगी,राहाता पंचायत समितीचे उपसभापती ओमेश जपे,सह मित्रमंडळ,ग्रामस्थ,मोठया संख्येने उपस्तीत होते

जाहिरात
Search
विडिओ
Recent News