शिक्रापूर येथे दोन कारच्या काचा फोडून ३ लाख ३७ हजार रुपये लंपास तर पाच जणांवर गुन्हा दाखल


शिक्रापूर येथे दोन कारच्या काचा फोडून ३ लाख ३७ हजार रुपये लंपास तर पाच जणांवर गुन्हा दाखल

शिरूर | प्रतिनिधी (अप्पासाहेब ढवळे)

शिरूर तालुक्यातील शिक्रापूर हद्दीत असलेल्या स्वागत हॉटेलच्या पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या दोन कारच्या दरवाजाच्या काचा फोडून पाच जणांनी ३ लाख ३७ हजार रुपये लंपास केले.या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढिल तपास शिक्रापूर पोलिस करत असल्याची माहीती पोलिस निरिक्षक तावसकर यांनी दिली.

    ताहेर मोहम्मद हुसेन सारोलावाला(रा.कोंढवा बुद्रुक, पुणे)यांनी फिर्याद दिली असुन पोलिस सुत्रांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी ताहेर मोहम्मद हुसेन सारोलावाला यांच्या तक्रारीवरून रात्रीच्या वेळी शिक्रापूरच्या हद्दीत असलेल्या हॉटेल स्वागताच्या पार्किंगच्या बाजूला लावलेली मारुती सुपर कॅरी गाडी नंबर (एम एच १२ आर एन ८८४१)ची काच फोडून त्याच बोर्ड फोडून तक्रारदाराच्या मालाचे रोख दोन लाख ५७ हजार रुपये तर अहमदनगर येथून काचेचा माल सोडून परत आलेल्या हरीश लक्ष्मण दास अजवानी ( रा.उंदरी,पुणे) यांच्या मारुती सुपर कॅरी गाडी नंबर(एम एच १२ एस एफ ३५६४)गाडीची दरवाजाची काच फोडून गाडीचा डॅशबोर्ड फोडून मालाची आलेली रोख रक्कम मारुती गाडी ठेवलेली ८०हजार रुपये असे दोन कार मधून दोघांची मिळून ३ लाख ३७ हजार रुपये या पाच आरोपींनी लंपास केले.

        शिक्रापूर पोलिसांनी या चोरीच्या प्रकरणी सदर गुन्ह्यातील आरोपी शब्बिर अकबर सुनेलवाला, अदनान इक्बाल लोखंडवाला, हकीम नजमुद्दिन लोखंडवाला, दशरथ भीमा जोगदंड, जुबेर कुद्दुस कुरेशी या पाच जणांना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढिल तपास शिक्रापूर पोलिस करत असल्याची माहीती पोलिस निरिक्षक तावसकर यांनी दिली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News