अखेर तृप्ती देसाई यांना अटक,शिर्डीत वृत्त धडकताच महिलांनी पेढे वाटून व फटाके फोडून केला आनंद वेक्त


अखेर तृप्ती देसाई यांना अटक,शिर्डीत वृत्त धडकताच महिलांनी पेढे वाटून व फटाके फोडून केला आनंद वेक्त

शिर्डी राजेंद्र दूनबळे(प्रतिनिधी) 

दर्शन पोशाख बाबत सगळीकडे वातावरण निर्मित झाल्याने आज तृप्ती देसाई शिर्डीत येणार असल्याचे तिने सांगितले होते कोणताही अनुचिर प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने चोक बंदोबस्त ठेवला होता श्री साईबाबां संस्थानने सभ्य गणवेशाबाबतचे फलक काढले नसल्यामुळे दिलेल्या इशार्‍याप्रमाणे तृप्ती देसाई यांनी शिर्डीत प्रवेश करु नये म्हणून पोलिसांनी नोटीस बजावली असूनही भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई या पुण्याहून शिर्डीकडे निघाले होत्या, मात्र पोलिसांनी त्यांना सूर्याजवळ अटक केली आहे तृप्ती देसाई यांच्या अटकेचे वृत्त शिर्डीत येतात प्रवेश द्वार चार समोर उपस्थित साईभक्त महिलांनी पेढे वाटून फटाके वाजवून आनंद व्यक्त केला ,, आज 10  तारिक 

दरम्यान तृप्ती देसाई शिर्डीत येणार म्हटल्यामुळे सकाळपासुनच येथेही शिर्डीत विविध संघटना, महिला संघटना ,साईभक्त यांची सुट्टी देसाई ना विरोध करण्यासाठी वेग वेगळ्या ठिकाणी मोठी गर्दी झाली असून पोलिस बंदोबस्त शिर्डीत वाढवण्यात आला आहे, जर तृप्ती देसाई शिर्डीत आल्यास त्यांना तीव्र विरोध करणेसाठी येथील महिला व साईभक्तांनी तयारी सुरू केली आहे ,त्यामुळे येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून शिर्डीचे डीवायएसपी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक प्रवीणचंद लोखंडे यांच्या सह शिर्डी पोलिसासह येथे मोठा फौजफाटा तयार आहे, मंदिर व परिसरातही सर्व प्रवेशद्वारावर पोलिसांचा फौजफाटा आहे, त्याचप्रमाणे शिर्डी येणाऱ्या रस्त्यांवरही पोलिस उभे असून शिर्डीत प्रवेश करणाऱ्यांची वाहनांची चौकशी केली जात होती ,त्याचबरोबर शिर्डीतील विविध संघटना महिला साईभक्त ही वेगळ्या ठिकाणी थांबून तृप्ती देसाई जर शिर्डीत आल्यात तर त्यांना तीव्र विरोध करण्याची तयारी साईभक्त महिलांकडून सुरू होती, त्यामुळे शिर्डीत सकाळपासून दुपारपर्यंत वातावरण तंग बनले होते ,नोटीस देऊनही तृप्ती देसाई शिर्डीत येत आहेत, मात्र पोलिसांनीही मोठा बंदोबस्त येथे लावला आहे, तृप्ती देसाई ह्या पुणेयेथुन निघून नगरकडे या येत होत्या मात्र सुपा जवळ तृप्ती देसाई यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, शिर्डी पर्यंत येण्यासाठी पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेट्स लावून तपासणी नाके सुरू केले होते, त्यामुळे तृप्ती देसाई यांना कुठेही पोलिस ताब्यात घेऊ शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली होती, त्यांना सुपे येथे ताब्यात घेण्यात आले आहे, दरम्यान शिर्डीत साई भक्त महिला या मात्र मोठ्या संख्येने अटी व शर्ती राखत वेगवेगळ्या ठिकाणी जमा झाल्या होत्या,त्यामुळे ते देसाई शिर्डीत आल्या तर त्यांना प्रखर विरोध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती, , त्यामुळे शिर्डीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलीस व माता ब्रिगेडचे अध्यक्ष तृप्ती देसाई यांना सुपा येथे ताब्यात घेतले असून त्यांना८ते११ डिसेंबर पर्यंत शिर्डी हद्दीत येण्यास मनाई ची नोटीस दिली होती, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली आहे, दरम्यान शिर्डी मधील अनेक साईभक्त महिलांनी तृप्ती देसाई या फक्त प्रसिद्धीसाठी स्टंट करीत आहेत विविध धार्मिक ठिकाणी त्यांनी असाच प्रसिद्धीसाठी स्टंट केला होता मात्र शिर्डीत हा प्रसिद्धीसाठी होणारा स्टंट त्यांचा यशस्वी होणार नाही असे शिर्डीतील महिला यावेळी बोलत होत्या, दरम्यान तृप्ती देसाई यांना सुप्या जवळ अटक होताच व हे वृत्त शिर्डी धडकताच शिर्डीत उपस्थित साई संस्थान च्या मंदिर प्रवेशद्वार चार समोर महिलांनी पेढे वाटून फटाके वाजवून मोठा आनंद व्यक्त केला व यापुढे राज्यात कोठेही त्या मंदिरात जाऊन त्यांची प्रसिद्धीसाठी स्टंट बाजी आम्ही महिला आता यापुढे होऊ देणार नाही असेही ब्राह्मण महासंघ, शिवसेना महिला आघाडी तसेच अनेक साईभक्त महिला व इतर संघटनेच्या महिलांनी यावेळी व्यक्त केला,

जाहिरात
Search
विडिओ
Recent News