शिरूर नगरपरिषदेच्यावतीने माझी वसुंधरा अभियान...शहरातील विविध भागात वृक्षारोपण करून श्रमदान शिबीर


शिरूर नगरपरिषदेच्यावतीने माझी वसुंधरा अभियान...शहरातील विविध भागात वृक्षारोपण करून श्रमदान शिबीर

नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे :-  मुख्याधिकारी महेश रोकडे 

शिरूर | प्रतिनिधी (अप्पासाहेब ढवळे )

माझी वसुंधरा अभियानांतर्गत शहरातील विविध भागात शिरूर नगरपरिषदेच्यावतीने वृक्षारोपण करून श्रमदान शिबीर घेण्यात आलेे.

          याप्रसंगी नगराध्यक्षा वैशाली वाखारे, नगरसेविका मनिषा कालेवार, नगरपरिषद कर्मचारी रविंद्र साळुंके,अयुब सय्यद,प्रमोद पवार,स्वच्छता विभागाचे दत्तात्रय बर्गे,नेमिचंद नेमाडे,पाणी पुरवठा विभागाचे भगवान दळवी,रविंद्र वारे,दिलीप वाघमारे,अमृत भंवर,प्रशांत शेलार,सचिन सुडके, एकनाथ गायकवाड,महेश गावडे,पल्लवी खिलारे, सुप्रिया बोराटे,निखिल कांचन,मनोज अहिरे,सागर कांबळे यांसह उपस्थित होते.

 माझी वसुंधरा अभियानांतर्गत शिरूर नगर परिषदेच्या वतीने श्रमदान शिबीर व शहरातील विविध भागात वृक्षारोपण दि.३० डिसेंबर पर्यंत घेण्यात येणार असुन या अभियानात रोज नगरपरिषदेचे कर्मचारी सहभागी होणार असणार आहेत.शहरातील एसटीपी प्लाँट,खारेमळा यांसह विविध ठिकाणी विविध प्रकारच्या वृक्षारोपण करून श्रमदान शिबीर घेऊन आक्सिजन पाँईंट तयार करण्यात येत असुन नागरिकांनीही अभियानात सहभागी होण्याचे आवाहन शिरूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News