महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा सचिव पदी अफजल खान


महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा सचिव पदी अफजल खान

पुणे (प्रतिनिधी) : येथील पोलीस रक्षक वृत्तपत्राचे सहसंपादक अफजल खान इस्माईल खान यांची महाराष्ट्र लघु वृत्तपत्र व पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा सचिव पदी नुकतीच निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र व ओळखपत्र पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष शेख बरकत अली यांनी अफजलखान यांना प्रदान केले. अफजलखान हे मूळचे वडगाव शेरी येथील रहिवासी असून त्यांचे सामाजिक कार्य व उत्कृष्ट पत्रकारिता पाहाता त्यांच्यावर पुणे जिल्हा सचिव पदाची जबाबदारी सोपविण्यात आली असल्याची माहिती पत्रकार संघाचे महासचिव शेख फकीर महंमद यांनी दिली.

     त्यांच्या या निवडीबद्दल पत्रकार संघाच्या वतीने शेख बरकत अली, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष राजमोहंमद शेख, प्रदेश उपाध्यक्ष बी.के. सौदागर, प्रदेश सचिव किशोर गाडे, औरंगाबाद जिल्हाध्यक्ष रियाजखान पठाण, मराठवाडा जिल्हाध्यक्ष विलास पठारे, नाशिक जिल्हाध्यक्ष उस्मानभाई शेख, नासिक जिल्हा कार्याध्यक्ष मन्सूरभाई मुलाणी, मनमाड शहराध्यक्ष अनिल देवरे, रायगड जिल्हाध्यक्ष मुदस्सीर पटेल, येवला शहराध्यक्ष सूर्यकांत गोसावी, चांदवड शहराध्यक्ष सोमा सुखदेव केदारे, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष सुभाषराव गायकवाड, शिर्डी शहराध्यक्ष विजय खरात, राहाता तालुका उपाध्यक्ष शब्बीर कुरेशी, महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अमीरभाई जागीरदार, शेवगाव तालुका अध्यक्ष सज्जादभाई पठाण, चांदवड तालुका उपाध्यक्ष राहुल गायकवाड तसेच अकबरभाई शेख, जावेद शेख, साईनाथ बनकर, अरुण त्रिभुवन आदींनी त्यांचे अभिनंदन केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News