वंचित बहुजन आघाडी शाखा कांबी व माणूसकी प्रतिष्ठाण तर्फे रक्तदान शिबीर संपन्न राज्यात रक्त साठ्याचा तुटवडा,,,,


वंचित बहुजन आघाडी शाखा कांबी व माणूसकी प्रतिष्ठाण तर्फे रक्तदान शिबीर संपन्न  राज्यात रक्त साठ्याचा तुटवडा,,,,

रक्तदात्यांनी रक्त दानासाठी पुढे यावे-असे आवहान वंचित बहुजन आघाडी शाखा अध्यक्ष मा  कैलास चोरमले यांनी केले आहे

सज्जात पठाण शेवगाव प्रतिनिधी:

.कोरोना महामारीच्या या काळात रक्तदान शिबीरे बंद असल्याने रक्त संकलन होऊ शकले नाही मात्र या काळात रूग्णावर उपचारासाठी मोठ्या प्रमाणात रक्त ची आवश्यकता भासली .आता राज्यात ५  ते  ६   दिवस पुरेल इतकाच रक्त साठा उपलब्ध असून संभाव्य तुटवडा लक्षात घेऊन रक्तदात्यांनी  स्वयं प्रेरणेने रक्त दानासाठी  पुढे यावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडी कांबी चे अध्यक्ष कैलास चोरमले यांनी केले .राज्य शासनाने नुकतेच जनतेला रक्त दानाचे आवाहन केले होते त्यास  प्रतिसाद देत अध्यक्ष कैलास चोरमले  व माणुसकी प्रतिष्ठाण यांनी महालक्ष्मी मंदिर परिसरात   रक्त दान शिबीराचे आयोजन केले होते . यावेळी  कांबी ग्रामपंचायत चे माजी उपसरपंच अशोक नाना म्हस्के, समाज प्रबोधनकार कृष्णा महाराज कुऱ्हे , संजय भेरे,  डॉ ज्ञानेश्वर मगर ,डॉ इंगोले मँडम,सिव्हिल हाँस्पिटल नगर,माजी ग्रामपंचायत सदस्य बंडू पाटील बुडखे, भैय्या सय्यद, गोविंद गाडे, विठ्ठल मगर,रवि साबळे, अंकुश टेलर ,रविंद्र कुऱ्हे, खराद नितीन ,अल्पेश भेरे , व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

अध्यक्ष चोरमले पुढे म्हणाले की ,रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असुन ते रुग्णाचा प्राण वाचवते , त्यामुळे युवकांनी व सामाजिक संस्थांनी पुढे येऊन रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे गरजेचे आहे .या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे कांबी शाखा उपाध्यक्ष शेख पिरमोहंमद, विठ्ठल मगर, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब मगर,पमु भेरे, रविंद्र कुर्हे,संजय भेरे, सुलतान शेख, गोविंद गाढे, रमेश दुसंगे, विश्वास गाढे, कमलेश्वर नर्के,युसुबभाई सैय्यद,अकबर शेख,सभांजी गावडे,व ईतर सामाजिक वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी हजर होतेज्ञसर्व रक्तदान करणार्यांना प्रशस्ती पत्र देवून सन्मानित करण्यात आले शेख पिरमोहंमद यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News