नॅशनल ॲन्टी करप्शन व क्राईम कन्ट्रोल ब्युरो कडून भ्रष्टाचार दिना निमीत्त मास्क वाटप


नॅशनल ॲन्टी करप्शन  व क्राईम कन्ट्रोल ब्युरो कडून भ्रष्टाचार दिना निमीत्त  मास्क  वाटप

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण 

                   नॅशनल ॲन्टी करप्शन  व क्राईम कन्ट्रोल ब्युरो संस्थेच्या कडून भ्रष्टाचार दिना निमीत्त पोलिस उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंढे, पोलिस उपनिरीक्षक सुजित ठाकरे, राष्ट्रीय पोलिस प्रोटेक्शन अध्यक्ष असलम शेख यांच्या  हस्ते पैठण गेवराई महामार्गावर मास्कचे  वाटप करण्यात आले.

                   नॅशनल ॲन्टी करप्शन  व क्राईम कन्ट्रोल ब्युरो संस्थेच्या वतीने भारतात जवळपास सर्वच राज्यात आपले कार्य प्रसारित केले असून शासकीय कामात होणारे भ्रष्टाचार व लाच प्रकरणी नागरिकांना दिलासा देणारी संस्था म्हणुन कार्यरत आहे. यावेळी संतोष दारकुंडे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष, जावेद शेख अहमदनगर जिल्हा अध्यक्ष, महेश महाराज हरवणे जिल्हा उपाध्यक्ष, अमोल दाते अहमदनगर सचिव, दिलीप उगलमुगले सहसचिव, कल्याण देवढे संपर्क प्रमुख, रामकिसन महाराज तापडिया शेवगाव तालुका सुरक्षा अध्यक्ष, अल्ताफ शेख शेवगाव तालुका अध्यक्ष, शिवाजी वेताळ शेवगाव तालुका उपाध्यक्ष सुरक्षा, मा.इसाक शेख संतोष चिंतामणी महाराष्ट्र सचिव, वैभव जाधव शेवगाव उपाध्यक्ष, लक्ष्मण नागरे, राजू शेख, प्रकाश कासलीवाल पैठण तालुकाध्यक्ष, महेश कासलीवाल पैठण तालुका उपाध्यक्ष, अनिस बिबन खाटिक नेवासा तालुका अध्यक्ष, राजू शेख तालुका सहसचिव, जयश्रीताई ससाणे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष, शकुंतला ससाणे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष, शाम ससाणे युवा जिल्हाध्यक्ष आदी उपस्थिती होती.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News