एमआयडीसी मधील घरकुल वंचितांना देखील मिळणार घरासाठी जागा मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाचा निर्णय


एमआयडीसी मधील घरकुल वंचितांना देखील मिळणार घरासाठी जागा  मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाचा निर्णय

आत्मनिर्भर भूमीगुंठा आवास योजना

घरकुल वंचितांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी डायनॅमिक सोशल इंजीनियरिंग प्रोसेस तंत्र अवलंब करण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने महसुल गांव निंबळक (ता. नगर) सर्व्हे नं. 54 येथील दहा एकर जमीनीवर आत्मनिर्भर भूमीगुंठा आवास योजनेतून घरकुल वंचितांना घरांसाठी जागा उपलब्ध करुन दिली असताना, एमआयडीसी मधील घरकुल वंचितांना देखील जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर घरकुल वंचितांचा प्रश्‍न सोडविण्यासाठी डायनॅमिक सोशल इंजीनियरिंग प्रोसेस तंत्र अवलंब करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली. 

घरकुल वंचितांचा प्रश्‍न डायनॅमिक सोशल इंजीनियरिंग प्रोसेस तंत्राने सोडवता येणार आहे. या तंत्राचा वापर देशाच्या प्रगतीसाठी करता येणे शक्य आहे. परंतू देशातील लोकप्रतिनिधी व शासकीय प्रणाली या तंत्रापासून लांब आहे. यामुळे सर्वसामान्य घरकुल वंचितांचे प्रश्‍न स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतर देखील सुटलेले नाहीत. संघटनेच्या वतीने डायनॅमिक सोशल इंजीनियरिंग प्रोसेस तंत्र अवलंब करण्याची मागणी करण्यात आली आहे. निंबळक येथील आत्मनिर्भर भूमीगुंठा आवास योजनेतून 230 घरकुल वंचितांना 80 हजार रुपयात एक गुंठा जमीन देण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून एमआयडीसी येथील घरकुल वंचितांना देखील घरासाठी जागा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. अनेक कामगारांना या प्रकल्पाच्या माध्यमातून हक्काचा निवारा मिळणार आहे. घरे नसल्याने एमआयडीसीतील कामगारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून कामगारांना हक्काची घरे मिळणार आहे. कामगारांकडून अर्ज स्विकारण्याचे काम सुरु करण्यात आले असून, घरकुल वंचित कामगारांनी त्वरीत अर्ज भरुन देण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी अ‍ॅड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, जालिंदर बोरुडे, अशोक भोसले, पोपट भोसले, हिराबाई ग्यानप्पा, विठ्ठल सुरम, अंबिका जाधव, विमल सांगळे, रोहिणी पवार, हिराबाई शेकटकर, लतिका पाडळे, फरिदा शेख आदि प्रयत्नशील आहेत. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News