नाताळसुट्टी व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त कोरोना विषाणूच्‍या पार्श्‍वभुमीवर पदयात्रींनी शिर्डी येथे पालखी आणू नये.


नाताळसुट्टी व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त कोरोना विषाणूच्‍या पार्श्‍वभुमीवर पदयात्रींनी शिर्डी येथे पालखी आणू नये.

शिर्डी ,राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी

      नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त होणारी संभाव्‍य गर्दी व कोरोना विषाणू (कोव्‍हीड १९) च्‍या पार्श्‍वभुमीवर श्रीं च्‍या दर्शनाकरीता येतानी साईभक्‍तांनी आपली गैरसोय टाळण्‍यासाठी ऑनलाईन दर्शन पास घेवुनच शिर्डीला यावे. तसेच दरवर्षी नियमित पालखी घेऊन येणा-या पदयात्रींनी शिर्डी येथे पालखी आणू नये, असे आवाहन संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी केले.

            कान्‍हूराज बगाटे म्‍हणाले, श्री साईबाबांवर श्रध्दा असणारे असंख्य भाविक दरवर्षी नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागतानिमित्‍त शिर्डीला येवून श्रीं च्‍या समाधीचे दर्शन घेतात व महाराष्‍ट्रसह इतर राज्‍यांतुन शेकडो पालख्‍यांसह पदयात्री शिर्डीत हजेरी लावतात. परंतु यावर्षी संपुर्ण जगभरात, देश व राज्‍यात आलेल्‍या कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्‍हणून शासनाच्‍या वतीने लॉकडाऊन करण्‍यात आले असून दिनांक १७ मार्च पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर साईभक्‍तांना दर्शनासाठी बंद ठेवण्‍यात आलेले होते. त्‍यामुळे यावर्षी संस्‍थानच्‍या वतीने साजरे करण्‍यात येणारे श्री रामनवमी, श्री गुरुपौर्णिमा व श्री पुण्‍यतिथी आदी उत्‍सव अतिशय साध्‍या पध्‍दतीने व भाविकांविना साजरे करण्‍यात आलेले आहेत. तसेच यासर्व उत्‍सवामध्‍ये पालखी घेऊन शिर्डी येथे येऊ नये, असे आवाहन ही संस्‍थानच्‍या वतीने वेळोवेळी पदयात्री साईभक्‍तांना व पालखी मंडळांना करण्‍यात आले होते.

             सध्‍या दिनांक १४ नोव्‍हेंबर २०२० रोजी राज्‍य शासनाच्‍या आदेशान्‍वये दिनांक १६ नोव्‍हेंबर पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्‍या दर्शनासाठी काही अटी/शर्तींवर खुले करण्‍यात आलेले आहे. अजुन कोरोनाचे सावट संपले नसुन सर्व साईभक्‍तांनी आपल्‍या   आरोग्‍याच्‍या दृष्‍टीने काळजी घेणे आवश्‍यक आहे. तसेच संस्‍थानच्‍या वतीने विविध उपाययोजना करण्‍यात आलेल्‍या आहेत. त्‍यामुळे नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्‍वागता निमित्‍त शुक्रवार दिनांक २५ डिसेंबर २०२० ते रविवार दिनांक ०३ जानेवारी २०२१ याकालावधीत गर्दी होवु नये म्‍हणुन साईभक्‍तांनी शिर्डी येथे श्रीं चे दर्शनाकरीता येतानी संस्‍थानच्‍या online.sai.org.in या संकेतस्‍थळावरुन ऑनलाईन दर्शन पास घेवुनच यावे. ऑनलाईन पास निश्चित झाल्‍यानंतरच शिर्डी प्रवासाचे नियोजन करावे. तसेच अधिक माहितीसाठी संस्‍थानच्‍या www.sai.org.in या संकेतस्‍थळावर संपर्क करावा.

                 तरी कोरोना विषाणुच्‍या पार्दुभावामुळे श्रीं च्‍या दर्शनाकरीता ठरावीक संख्‍येनेच मंदिरात प्रवेश दिला जात असल्‍यामुळे ऑनलाईन बुकींग निश्चित झालेली असेल अशाच साईभक्‍तांनी शिर्डी येथे दर्शनाकरीता यावे अन्‍यथा गैरसोय होऊ शकते. तसेच मास्‍कचा वापर न करण्‍या-या साईभक्‍तांना, १० वर्षाखालील मुलांना, गरोदर स्त्रिया व ६५ वर्षावरील व्‍यक्‍तींना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. याशिवाय मंदिरात फुलं, हार व इतर पूजेचे साहित्‍य नेण्‍यास सक्‍त मनाई आहे. याबरोबरच जे साईभक्‍त आजारी आहेत अशा साईभक्‍तांनी दर्शनाकरीता येऊ नये असे सांगुन पदयात्री साईभक्‍तांनी व पालखी मंडळांनी पालखी शिर्डी येथे आणू नये, असे आवाहन ही कान्‍हूराज बगाटे यांनी केले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News