जिल्हा रुग्णालयातील सुरक्षारक्षकांना कामावर पुन्हा रुजू करुन न्याय देण्याची मागणी


जिल्हा रुग्णालयातील सुरक्षारक्षकांना कामावर पुन्हा रुजू करुन न्याय देण्याची मागणी

जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सकांना निवेदन

कोरोनाच्या संकटकाळात सेवा करुन देखील घरी जाण्याची वेळ

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथे कोरोनाच्या संकटकाळात सेवा देत असलेल्या सुरक्षा रक्षकांना कामावरुन काढून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला असून, त्यांना पुन्हा कामावर रुजू करुन न्याय देण्याची मागणी जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे, गणेश निमसे, दीपक गुगळे, अमित गांधी, मच्छिंद्र गांगर्डे, शहानवाज शेख, अजय सोळंकी, संतोष उदमले, वसीम शेख, फारुख शेख, लक्ष्मण साळे, प्रशांत डहाळे, संतोष त्रिंबके, सुनील साळवे, निलेश सातपुते, योगेश घोलप, शहाबाज शेख, शब्बीर सय्यद, निलेश चौधरी, सोमनाथ पवार, अजय शिंदे आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.  दोन वर्षापासून अहमदनगर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामार्फत 17 सुरक्षारक्षक जिल्हा रुग्णालयात सुरक्षेचे काम करत होते. या सुरक्षारक्षकांनी 7 महिने कोरोनाच्या संकटकाळात चोख पद्धतीने आपले कर्तव्य बजावले. तरी रुग्णालयाने मागील नऊ महिन्याचे त्यांचे वेतन थकवले होते. यासाठी नाशिक विभागाने निधीची पूर्तता केली होती. परंतु कार्यालयीन हलगर्जीपणामुळे 1 कोटी 30 लाख 74 हजार एवढा निधी मागे गेला. सुरक्षारक्षकांना वेतन वेळेवर झाले असते, तर त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली नसती. नाशिक विभाग उपसंचालक मंडळाने या सुरक्षारक्षकांना कामावर रुजू करून घेण्याबाबत रुग्णालय प्रशासनाला विनंती अर्ज केला होता. परंतु रुग्णालय प्रशासनाने सुरक्षारक्षकांना हजर करून घेण्यास टाळाटाळ केली आणि सुरक्षारक्षक विरोधात चुकीची माहिती नाशिक विभागाला कळवली आहे. जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे प्रयत्न दुसर्‍या संस्थेकडून गार्ड घेण्याचे आहे. या सुरक्षारक्षकांनी नाशिक विभागाला संपर्क करायला नव्हता पाहिजे असे जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे होते. हाच राग मनात धरून पगार वारंवार मागू नये यासाठी सुरक्षा रक्षक बदलून घेण्याचे ठरविले आहे. सर्व सुरक्षारक्षक यांनी शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर वारंवार पगाराची मागणी करणार नाही, आपल्या अटी व शर्ती मान्य असल्याचे लिहून देण्यास तयार होते. तरी देखील त्यांना हजर करुन न घेता इतर कंत्राटी कामगारांना कामावर रुजू करुन घेण्याचा मनमानी कारभार जिल्हा रुग्णालय प्रशासनाने केला असल्याचे निवेदनता म्हंटले आहे. तरी तातडीने जिल्हा रुग्णालयात सुरक्षा रक्षकांना कामावरुन काढून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला असून, त्यांना पुन्हा कामावर रुजू करुन न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा दि.15 डिसेंबर नंतर सुरक्षारक्षकांच्या परिवारास अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथे कोरोनाच्या संकटकाळात सेवा देत असलेल्या सुरक्षा रक्षकांना कामावरुन काढून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला असून, त्यांना पुन्हा कामावर रुजू करुन न्याय देण्याच्या मागणीचे निवेदन जन आधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांना देताना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोटे समवेत गणेश निमसे, दीपक गुगळे, अमित गांधी, मच्छिंद्र गांगर्डे, शहानवाज शेख, अजय सोळंकी, संतोष उदमले, वसीम शेख, फारुख शेख, लक्ष्मण साळे, प्रशांत डहाळे, संतोष त्रिंबके, सुनील साळवे, निलेश सातपुते, योगेश घोलप, शहाबाज शेख, शब्बीर सय्यद, निलेश चौधरी, सोमनाथ पवार, अजय शिंदे आदि. (छाया-साजिद शेख-नगर)

जाहिरात
Search
विडिओ
Recent News