सुरेश बागल कुरकुंभ:प्रतिनिधी
डी बी एन ग्रुप व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) व दिपकभाऊ निकाळजे सामाजिक विकास संघ दौंड च्या वतीने विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्या समयी आर पी आय(अ) व डी बी एन ग्रुप चे दौंड तालुकाध्यक्ष सचिन भाऊ खरात यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला .संघटनेचे व पक्षाचे शशांक गायकवाड, प्रवीण धर्माधिकारी ,विजय शिंदे ,अभय भोसले ,बाबा कोरे, अरबाज शेख ,बबलु वाल्मिकी ,ईश्वर सांगळे ,विनय सोनवणे, आनंद ओव्हाळ, नागेश दादा वंदन वाघमारे, सचिन पोळ ,अजय भोसले, प्रशांत मदने, प्रबोधन सांगळे, व आमचे बंधू नागेशराव साळवे व डी बी एन ग्रुप व आर पी आय (आंबेडकर) चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.