शेवगांव वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याने तृतीय पंथीनां रेशन कार्ड मिळाले


शेवगांव वंचित बहुजन आघाडीच्या पाठपुराव्याने तृतीय पंथीनां रेशन कार्ड मिळाले

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण : अनेक वेळा रेशन कार्ड चे फॉर्म भरून दिले असतांना कोणत्याढही आधिकार्यांनी दक्षता घेतली नाही परंतु वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र महासचिव मा किसन चव्हाणसर यांना तृतीय पंथीनी भेटून आपल्या व्यथा सांगितल्या रहायला कोणी घर देत नाही, कोणी ही काम देत नाही,लोंकांचा पहाण्याचा दृष्टीकोण चांगला नाही आशा अनेक व्यथा तृतीय पंथीनी व्यक्त केल्या क्षणाचाही विलंब न करता मा किसन चव्हाणसर यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला व कोरोना काळात उपासमारी ने त्रस्त असलेल्या तृतीय पंथींना प्रथम (रेशनकार्ड) शिधा पत्रिका मिळवून देण्यास वंचित बहुजन आघाडीचे शेवगांव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलाल भाई शहर अध्यक्ष विशाल ईगंळे, लखन घोडेराव, शेख सलीम जिलाणी,यांना सुचना दिल्या व तहसील पुरवठा अधिकारी यांना सविस्तर माहीती देवून शिधा पत्रिका मिळवण्या करिता माहीती दिली तत्परता दाखवून पुरवठा अधिकारींनी योग्य मार्गदर्शन केले तसेच या करिता शेवगांव तहसीलदार आर्चना पागीर यांनी ही योग्य निर्णय घेत तृतीय पंथींची गरज लक्षात घेऊन त्वरीत शिधा पत्रिका ( रेशन कार्ड) दिले या शिधा पत्रिका देण्याकरिता शेवगांव तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी व तहसीलदार आर्चना पागीर मॅडम यांचे मा किसन चव्हाणसर, शेख प्यारेलालभाई विशाल ईगंळे,अन्सार भाई कुरैशी,लखन घोडेराव, शेख सलीम जिलाणी व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्यांनी मा तहसीलदार आर्चना पागीर मॅडम यांचे आभार व्यक्त केले असेच सहकार्य वंचितांना सर्व खात्यातील शासकिय आधिकार्यांनी करावे आशी अपेक्षा मा किसन चव्हाणसर यांनी व्यक्त केली वंचित बहुजन आघाडीला कोणतेही आंदोलन करण्यास भाग पाडू नये असे वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र महासचिव मा किसन चव्हाणसर म्हणाले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News