सावळीविहिर येथे,महावितरण राहाता उपविभागीय अंतर्गत उपक्रम. ग्राहकांशी संवाद व ग्राहकांच्या शंकेचे निरसन


सावळीविहिर येथे,महावितरण राहाता उपविभागीय अंतर्गत उपक्रम. ग्राहकांशी संवाद व ग्राहकांच्या शंकेचे निरसन

शिर्डी,राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी

एक गाव एक दिवस... महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित महावितरण राहाता उपविभागीय अंतर्गत उपक्रम.... ग्राहकांशी संवाद व ग्राहकांच्या शंकेचे निरसन करून समाधान करण्याच्या हेतुने एक गाव एक दिवस हा उपक्रम आज राहाता तालुक्यातील सावळी विहीर बुद्रुक येथे हनुमान मंदीरात घेण्यात आला यावेळी महावितरण अधिकक्षक अभियंता  संतोष सांगळे ,व बी बी गोसावी कार्यकारी अभियंता संगमनेर यांच्या मार्गदर्शनाखाली डी डी पाटील यांच्या नेतृत्वाखाली सदर उपक्रम तालुक्यातील गावांमध्ये घेत आहे, यावेळी महावितरणाचे अभियंता राठोड यांच्या अथक परिश्रमाने हा उपक्रम तालुक्यातील गावांमध्ये राबविण्यात येत आहे या उपक्रमाबद्दल अधिक माहिती दिलीय डी डी पाटील यांनी दिली,

महावितरणच्या या उपक्रमामुळे नक्कीच ग्राहकांचे समाधान होत असुन, ग्राहकांच्या शंकेचे निरसन तसेच समस्या ताबडतोब महावितरण अधिकारी व कर्मचारी सोडवत असुन महावितरणाच्या या उपक्रमात रखडलेली वीज बील यावेळी भरली जात आहे.....सदर उपक्रमास ग्राहकांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते.....

या उपक्रमांद्वारे गावातील रोहित्र देखभाल व दुरुस्ती, लुज गाळे ओढणे व स्पेसर, अडचणी चे झाडे तोडणे, या संबंधीत तसेच ग्राहकांच्या समस्या समजून घेवुन निरसण या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

सावळी विहीर येथे आज सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी महावितरणचे कनिष्ठ अभियंता शेख , बोडखळ , पानसरे,भरणा विभाग काडेकर,भिंगारदिवे, विद्युत कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते...

जाहिरात
Search
विडिओ
Recent News