80 पैकी 41 ग्रामपंचायतीवर महिलाराज,दौंड तालुक्यात निवडणुकीचे पडघम


80 पैकी 41 ग्रामपंचायतीवर महिलाराज,दौंड तालुक्यात निवडणुकीचे पडघम

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

- दौंड तालुक्यातील 80 गावाच्या सरपंचाच्या आरक्षणाची सोडत जाहीर,दौंड चे तहसीलदार संजय पाटील यांनी दौंड येथील SRP ग्रुप नंबर 5 च्या मंगलमूर्ती सभागृहात ही सोडत जाहीर केली, या ठिकाणी गावोगावच्या इच्छुकांनी हजेरी लावली होती,80 पैकी 41 ग्रामपंचायतीवर महिलाराज,8 डिसेंबर रोजी दुपारी ही सोडत जाहीर करण्यात आली, त्यामध्ये 

अ)अनुसूचित जमाती -2

ब)अनुसूचित जाती -12

क)नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला -11

ड)नागरिकांचा मा.प्रवर्ग सर्वसाधारण-10

इ)सर्वसाधारण महिला -23

ई)सर्वसाधारण -22 

अशी 80 गावांच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत 8 डिसेंबर रोजी झाली आहे,

(अ) अनुसूचित जमाती साठी दोन जागा,त्यामध्ये एक जागा अनुसूचित जमाती महिला साठी आहे,1) राजेगाव,2) पाटेठाण (अनुसूचित जमाती महिला).(ब)अनुसूचित जाती साठी 12 जागा,त्यामध्ये 6 ठिकाणी महिला सरपंच होणार आहेत, 1) वडगाव दरेकर ( अ. जाती महिला),2)कानगाव (अ जाती),3) कोरेगाव भिवर (अ जाती),4)पडवी (अ जाती महिला),5) पांढरेवाडी (अ जाती),6) खोर (अ जाती महिला),7) नायगाव (अ जाती),8) दहीटने (अ जाती महिला),9) बिरोबावाडी (अ जाती महिला),10) वाखारी (अ जाती),11) जिरेगाव (अ जाती महिला),12) कुरकुंभ (अ जाती).(क)नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 11 जागा--1) बोरिभडक,2)गोपाळवाडी,3)लोणारवाडी,4) खुटबाव,5)मळद,6)शिरापूर,7)लडकतवाडी,8)नानगाव,9)गार,10)खोपोडी,11)एकेरीवाडी.(ड)नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण 10 जागा-- 1)गिरीम,2)हिंगणीबेर्डी,3)कडेठाण,4)नानवीज,5)पिलाणवाडी,6)टेळेवाडी,7)आलेगाव,8)खामगाव,9)उंडवडी,10)पेडगाव.(इ)सर्वसाधारण महिला साठी 23 जागा --1)भरतगाव,2)चिंचोली,3)देवकर वाडी,4)कासुर्डी,5)कोठडी,6)कुसेगाव,7)खानोटा,8)मलठण,9)नंददेवी,10)पाटस,11)पिंपळगाव,12)पानवली,13)रावणगाव,14)सहजपूर,15)ताम्हणवाडी,16)वाटलुज,17)वासुंदे,18)वरवंड,19)केडगाव,20)खडकी,21)राहू,22)रोटी,23)हिंगणीगाडा. (ई)सर्वसाधारण 22 जागा --1)बोरीपार्धी,2)बोरिबेल,3)भांडगाव,4)डाळींब,5)दापोडी,6)देलवडी,7)देऊळगाव गाडा,8) देऊळगाव राजे,9)गलांडवाडी,10)हातवळण,11)लिंगाळी,12)मिरवडी,13)टाकळी,14)नांदूर,15)नाथाची वाडी,16)पारगाव,17)सोनवडी,18)वाळकी,19)यवत,20)वडगाव बांडे,21)बोरिएंदी,22)खोरवडी.या प्रमाणे सरपंच आरक्षण सोडत झाली असल्याची माहिती तहसीलदार संजय पाटील यांनी दिली आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News