सामाजिक कार्यकर्ते व झुंजार पञकार रमेश जेठे यांचा वर्ल्ड पार्लमेन्ट कडून स्तुत्य व खऱ्या सामाजिक कामाचा सन्मान व गौरव - डाॅ.दत्ता विघावे


सामाजिक कार्यकर्ते व झुंजार पञकार रमेश जेठे यांचा वर्ल्ड पार्लमेन्ट कडून स्तुत्य व खऱ्या सामाजिक कामाचा सन्मान व गौरव - डाॅ.दत्ता विघावे

शिर्डी,राजेंद्र दूनबळे, प्रतिनिधी: 

WORLD CONSTITUTION & PARLIAMENT ASSOCIATION अर्थात जागतिक संविधान व संसदीय संघ( WCPA) वतीने श्रीरामपूर नगरपरिषद येथे दिमागदार कार्यक्रम  संपन्न झाला. रमेश जेठे हे झुंजार पञकार असून त्यांचे सामाजिक कार्य ही उल्लेखनीय आहे. असे यावेळी कार्यक्रमात ते बोलत होते. या स॔घटनेच्या माध्यमातून वैशिष्ट्यपुर्ण व उल्लेखनीय कामगिरी असलेल्या व्यक्तींचे सन्मान व उचित गौरव दरवर्षी करण्यात येतो. या वर्षी देखील  विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी असलेल्या व्यक्तीचे सन्मान व गौरव पुरस्कार देऊन करण्यात आले.

या कार्यक्रमात विशेष म्हणजे देहरे (अहमदनगर) येथील सामाजिक कार्यकर्ते  व  "शिर्डी एक्सप्रेस चे  संपादक रमेश जेठे यांनी कोरोना काळात लाॅकडाऊन मध्ये अनेक गोर-गरीब, संकटात सापडलेल्या पिडीत मजूरांना धान्य किट वाटले; मोठ्या शहरात मुंबई,पुणे.ठाणे,

नाशिक या ठिकाणी अडकलेल्या व संपर्कात असलेल्या शेकडो मजूरांना अधिकारी व पदाधिकारी यांचेशी  संपर्क साधून गावी पाठविण्याची व्यवस्था केली, कोरोना (कोविड-19) ग्रस्त पेशन्टला स्वतः भेटून त्यांचे मनोबल वाढवले, अनेक पिडीतांचे खाजगी हाॅस्पिटल चे बील कमी करून दिले. बांधकाम क्षेत्रातील  मजूरांना,वृध्दांना शासकीय योजनांचे आर्थिक सहाय्य, रेशन कार्ड नसणाऱ्यांना रेशन मिळवून देण्यासाठी शासनाकडे योग्य पाठपुरावा करून धान्य मिळवून दिले, कोरोना पेशन्टला हाॅस्पिटल ला त्वरीत जाता यावे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग  (PWD) अधिकारी यांना भेटून रस्ते त्वरीत दुरूस्ती करण्यास भाग पाडले.

लाॅकडाऊन मध्ये सर्व घरात होते त्याहीवेळी पञकारीतेच्या माध्यमातून पिडीतांचे अनेक प्रश्न प्रत्यक्ष पाहून शासनाच्या सचिव व मंञ्यांपर्यंत व्हाॅटसप व ईमेलव्दारे माहिती पाठवून त्यांना चांगले निर्णय घेण्यासाठी भाग पाडले. लाॅकडाऊन मध्ये मजल दरमजल प्रवास करणार्यांना अन्नकिट, पाणी  दिले, व जे जे करता येईल ते काम निस्वार्थपणे त्यांनी केले.यामुळे त्यांचे अभिनंदन करावे ते थोडेच आहे. कोरोना हे देशावरील मोठे संकट असून सर्वांनी सर्व नियमांचे पालन करून पिडीतांचे संरक्षण करणे हे त्यांनी महत्वाचे समजले. त्याचप्रमाणे त्यांचे कार्य निस्वार्थपणे व अविरत चालू आहे. यामुळे जागतिक संविधान व संसदीय संघ( WCPA)च्या वतीने त्यांचा योग्य सन्मान होणे उचित ठरेल. या उद्देशाने रमेश जेठे यांना  वर्ल्ड पार्लमेन्ट कोरोना वॉरियर्स अवाॅर्ड 2020 चे "वर्ल्ड पार्लमेन्ट कोरोना वारीयर्स " पुरस्कार मिळाला. त्यामध्ये  प्रमाणपञ, मेडल, ट्राॅफी देऊन श्रीरामपूर नगरपरिषद येथे म्हाडाचे अध्यक्ष ..शिवाजी राव ढवळे, राज्यमंञी दर्जा. WCPA  महाराष्ट्र (श्रीरामपूर चॅप्टर ) चे अध्यक्ष

  मा. डाॅ.दत्ता विघावे, नगराध्यक्षा मा.अनुराधाताई आदिक, संपादक परिषद कार्याध्यक्ष मा. प्रकाश कुलथे, प्रांताधिकारी मा.अनिल पवार , तहसीलदार मा. प्रशांत पाटील यांचे शुभहस्ते रमेश जेठे यांना सन्मानित करण्यात आले. यामुळे त्यांचे सर्वञ  शुभेच्छांसह अभिनंदन व कौतुक होत आहे.  यावेळी अनेक सन्मानार्थी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर नियमांचे पालन करत उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News