श्री लक्ष्मीनारायण शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर व स्व.श्रीनिवास कनोरे यांच्या पुण्यतिथी निमित्त वृक्षारोपण


श्री लक्ष्मीनारायण शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर व स्व.श्रीनिवास कनोरे यांच्या पुण्यतिथी निमित्त  वृक्षारोपण

नगर कल्याण रोडवरील श्री लक्ष्मीनारायण शाळेत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरीनिर्वाण दिन व स्व.श्रीनिवास कनोरे यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी नगरसेवक गणेश कवडे,अजय चितळे,श्रीमती नलिनी कनोरे,श्रीमती मृणाल कनोरे,ऋत्विका कनोरे, स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळाचे विश्वस्त प्रमुख अरविंद धिरडे, स्वकुळसाळी समाजाचे जिल्हाध्यक्ष गणेश अष्टेकर ,शिक्षण समितीचे चेअरमन विक्रम पाठक, विश्वस्त संजय सागांवकर,जितेंद्र लांडगे, राम भंडारे,बाबासाहेब वैद्य,सौ वैद्य,शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कल्पना भामरे आदी.(छाया अमोल भांबरकर)                                                                       

कनोरे कुटूंबाचे सामाजिक व शैक्षणिक कार्यात मोठे योगदान-गणेश अष्टेकर                                          

नगर( प्रतिनिधी संजय सावंत) -स्व.श्रीनिवास जयकुमार कनोरे यांनी स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळाच्या श्री लक्ष्मीनारायण शिशु शिक्षण मंदिर या शाळेच्या विस्तारासाठी नगर कल्याण रोडवरील ड्रीमसिटीच्या मागे 16 गुंठे जागा दिली.कनोरे कुटूंबाचे सामाजिक व शैक्षणिक कार्यात मोठे योगदान आहे.त्यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त श्री लक्ष्मीनारायण शाळेत वृक्षारोपण करण्यात आले आहे.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार तरुणांना प्रेरणादायी असे आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आदर्श कार्यामुळेच  देशाची लोकशाही भक्कम  झाली आहे.असे प्रतिपादन स्वकुळसाळी समाजाचे जिल्हाध्यक्ष गणेश अष्टेकर यांनी केले आहे.            

 नगर कल्याण रोडवरील ड्रीमसिटीच्या मागे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरीनिर्वाण दिन व स्व.श्रीनिवास कनोरे यांच्या प्रथम पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .तसेच मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.याप्रसंगी नगरसेवक गणेश कवडे,अजय चितळे,श्रीमती नलिनी कनोरे,श्रीमती मृणाल कनोरे,ऋत्विका कनोरे,स्वकुळसाळी हितसंवर्धक मंडळाचे विश्वस्त प्रमुख अरविंद धिरडे, स्वकुळसाळी समाजाचे जिल्हाध्यक्ष गणेश अष्टेकर,शिक्षण समितीचे चेअरमन विक्रम पाठक,विश्वस्त संजय सागांवकर,जितेंद्र लांडगे,राम भंडारे,बाबासाहेब वैद्य,सौ वैद्य,शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कल्पना भामरे,प्रदीप पाटेकर, जिव्हाळा प्रतिष्ठानचे विठ्ठलराव पाठक,सुभाष पाठक,सावेडी जिव्हेश्वर भक्तसेवा मंडळाचे उपाध्यक्ष अरुण दळवी, जिव्हेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश झिंजे,किरण डफळ,संजय दळवी आदींसह शाळेतील शिक्षकवृंद व स्वकुळसाळी समाज बांधव उपस्थित होते.                                                                          -

जाहिरात
Search
विडिओ
Recent News