महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेतर्फे श्री संत संताजी महाराज जयंती साजरी


महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेतर्फे श्री संत संताजी महाराज जयंती साजरी

संत जगनाडे महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त तेली खुंट येथे संताजी महाराज चौक फलकाचे अनावरण करुन नागरिकांना लाडू वाटप करण्यात आले. याप्रसंगी हरिभाऊ डोळसे,  जिल्हाध्यक्ष रमेश साळूंके, श्रीकांत सोनटक्के, प्रकाश सैंदर, सचिन म्हस्के, कृष्णाकांत साळूंके, विजय दळवी, परसराम सैंदर, दिलीप साळूंके, सुरेश देवकर, दत्तात्रय करपे, माधवराव ढवळे, विलास करपे, गोकूळ बोकेफोड, गणेश हजारे, किरण शिंदे, प्रकाश जुंदरे, चंद्रकांत लोखंडे, प्रमोद वाळके, देवीदास साळूंके, प्रा.अशोक डोळसे, देवीदास ढवळे आदि. (छाया : अमोल भांबरकर)

संत संतांजी जगनाडे महाराज यांनी लेखनातून समाज प्रबोधनाचे कार्य - हरिभाऊ डोळसे

     नगर( प्रतिनिधी संजय सावंत) -    संत संताजी महाराज यांनी आपला प्रपंच, व्यवसाय आणि समाज यात उत्तम संतुलन साधत. जगद्गुरु संत तुकाराम  महाराज यांचे शिष्य असलेले संत संताजी महाराजांनी अध्यात्म आणि विज्ञान लोकांना समजावून सांगितलं. त्यामुळे वैदिक कर्मकांड करणार्‍यांचा विरोध व छळ त्यांना भोगावा लागला. पण संत संताजी महाराज डगमगले नाहीत. त्यांनी आपल्या लेखनाचं व समाज प्रबोधनाचं कार्य सुरूच ठेवलं. संत संताजी महाराजांच्या विचारांचे अनुकरण करुन तैलिक महासभेचे कार्य सुरु आहे. त्या माध्यमातून पदाधिकारी समाजकार्य करत आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे नाशिक विभागीय कार्याध्यक्ष व पालकमंत्री हरिभाऊ डोळसे यांनी केले श्री संत जगनाडे महाराज यांच्या 396 व्या जयंतीनिमित्त तेली खुंट येथे संताजी महाराज चौक फलकाचे अनावरण करुन नागरिकांना लाडू वाटप करण्यात आले. याप्रसंगी हरिभाऊ डोळसे, प्रांतिक तैलिक महासभेचे महानगर जिल्हाध्यक्ष रमेश साळूंके, उपाध्यक्ष श्रीकांत सोनटक्के, प्रकाश सैंदर, सचिन म्हस्के, कार्याध्यक्ष कृष्णाकांत साळूंके, सचिव विजय दळवी, परसराम सैंदर, दिलीप साळूंके, सुरेश देवकर, दत्तात्रय करपे, माधवराव ढवळे, विलास करपे, गोकूळ बोकेफोड, गणेश हजारे, किरण शिंदे, प्रकाश जुंदरे, चंद्रकांत लोखंडे, प्रमोद वाळके, देवीदास साळूंके, प्रा.अशोक डोळसे, देवीदास ढवळे आदि उपस्थित होते. पुढे बोलतांना श्री.डोळसे म्हणाले,  संत तुकाराम महाराजांच्या गाथा पाण्यात बुडविण्यात आल्या होत्या त्यावेळी तुकाराम महाराज मोठ्या चिंतेत होते, त्या गाथांचे लेखन संत संताजी महाराजांनी स्मरणातून गाथांचे पुर्नलेखन केले, त्यामुळेच आज या गाथा आपणास मार्गदर्शक ठरत आहेत. नि:स्वार्थ कार्य करुन त्यांनी समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे. त्यांच्या विचाराचे आचारण करुन सर्व समाज सफल जीवन जगत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला तेली पंचाचा वाडा येथे संताजी महाराज यांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करण्यात आला

जाहिरात
Search
विडिओ
Recent News