महाराष्ट्र राज्य पञकार महासंघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी बाबा ढाकणे


महाराष्ट्र राज्य पञकार महासंघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी बाबा ढाकणे

शिर्डी,राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी

शिर्डी- महाराष्ट्र राज्य पञकार महासंघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब ढाकणे यांची नियुक्ती संघाचे अध्यक्ष डाॅ.राहुल जैन-बागमार व प्रमुख मार्गदर्शक अशोकराव सोनवणे यांनी केली आहे.

बाबा ढाकणे यांची महाराष्ट्र राज्य पञकार महासंघाच्या अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पञकार बबलू शेख, लहू दळवी, सुधीर कुलट, केदार भोपे, ज्ञानेश्वर दुधाडे, बाबा जाधव, राजेंद्र दूनबळे ,राजु गडकरी, तेजस शेलार यांनी अभिनंदन केले आहे, बाबासाहेब ढाकणे यांनी अनेक वंचित घटकांना ,पिढीत समाजाला आपल्या लेखणीतून न्याय मिळवून दिला,अतिषय, संयमी व मनमिळाऊ ,स्वभाव असल्याने त्यांचा मित्र परिवारही मोठा आहे ,नगर जिल्ह्यातील अनेक घडामोडीचा,त्याचा तगडा अभ्यास आहे,त्याच्या या निवडी बद्दल

अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ज्येष्ठ पञकारांसह अनेक मान्यवर पञकारांनी आणि सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी श्री ढाकणे यांचे अभिनंदन केले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News