कर्मवीर काळे कारखाना कार्यस्थळावर आमदार आशुतोष काळेंनी केले महामानवास अभिवादन


कर्मवीर काळे कारखाना कार्यस्थळावर आमदार आशुतोष काळेंनी केले महामानवास अभिवादन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करतांना आमदार आशुतोष काळे.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

              भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आमदार आशुतोष काळे यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी त्यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.

            यावेळी पंचायत समिती सभापती सौ. पौर्णिमाताई जगधने, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, संचालक सूर्यभान कोळपे, राजेंद्र मेहेरखांब, कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, समता सैनिक दलाचे जिल्हाप्रमुख के.पी. रोकडे, सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे, पोलीस पाटील संजय वाबळे, राहुल जगधने, ग्रामपंचायत सदस्या सौ. सविता लोंढे, रवींद्र देवकर, पत्रकार सिद्धार्थ मेहेरखांब, रमेश निकम, अरुण लोंढे, बाळासाहेब रोकडे,बाबासाहेब रोकडे,राजेंद्र मेहेरखांब (सर), बाळासाहेब मेहरखांब, उत्तम मेहरखांब, राहुल बनकर, बाळू मेहरखांब, रवींद्र डोलारे, उत्तम विघे,भरत मेहरखांब, बुद्धीस्ट फौंडेशन, बौद्ध महासभा व समता सैनिक दलाचे जवान, सन्मा. सदस्य तसेच बौद्ध उपासक, उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


                     

जाहिरात
Search
विडिओ
Recent News