चांदेकसारे गावात भैरवनाथ जयंती उत्साहात साजरी !!


चांदेकसारे गावात भैरवनाथ जयंती उत्साहात साजरी !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

 चांदेकसारे येथील श्री राम रतन पंचायतन आश्रम ट्रस्ट च्या भैरवनाथ जोगेश्वरी मंदिरात आज दि. सोमवारी 07/12/2020 रोजी भैरवनाथ देवाची जयंती साजरी करण्यात आली.

आज सकाळी श्री भैरवनाथ देवाला अभिषेक करण्यात आला.त्यानंतर गावातील सौ.व शंकरराव चव्हाण, भगीरथ होन,कल्याण होन,राजु होन, पुंजाजी होन या पाच लक्ष्मीनारायणा जोडप्यांचे हस्ते सत्यनारायण पुजा करण्यात आली पाच जोड्यांच्या हस्ते श्री सत्यनारायण पूजा करण्यात आली,

दरवर्षी गावात भैरवनाथ देवाची भव्य मिरवणुक काढुन २२१ लक्ष्मीनारायण जोडप्यांचे हस्ते सत्यनारायण पुजा करण्यात येत असे त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम तसेच रात्री भजन व किर्तनाचा भव्य कार्यक्रम होत असे परंतु या वर्षी कोरोना महामारीच्या संसर्गामुळे रथ मिरवणूक ,कीर्तन महोत्सव व अन्नदान हे कार्यक्रम रद्द करण्यात आले.अशी माहिती अध्यक्ष मधुकर होन यांनी दिली,

या कार्यक्रमास माजी सभापती सौ.अनुसाताई होन,रोहिदास होन,भगीरथ होन, विलास चव्हाण,किरण होन,संजय लाला होन,बाबासाहेब होन,शरद सीताराम होन,अनिरुद्ध चव्हाण,अनिल ताते,संदीप मिसाळ,मच्छिंद्र खरे,आदी ग्रामस्थ व भाविक हजर होते याप्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष मधुकर होन खजिनदार सचिन होन, सतिष चव्हाण,सागर होन,प्रविण होन,रविंद्र होन,नितीन होन,यांनी उपस्थित सर्व भाविकांचे आभार मानले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News