भारतीय जैन संघटनेच्या वतीने सचिन बोगावत यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार देउन सन्मान.


भारतीय जैन संघटनेच्या वतीने सचिन बोगावत यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार देउन सन्मान.

भिगवण(प्रतिनिधी)नानासाहेब मारकड भारतीय जैन संघटनेच्या वतीने सचिन बोगावत यांना उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य चे राज्यस्तरीय अधिवेशन जालना येथे ऑनलाइन पार पडले यावेळी पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता यामध्ये संस्थापक अध्यक्ष श्री शांतीलाल जी मुथा राष्ट्रीय अध्यक्ष श्री राजेंद्र जी लुंकड श्री अरुण जी फिरोदिया श्री वल्लभ जी भन्साळी व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री हस्तीमल जी बंब यांच्या उपस्थितीमध्ये पार पडले

यावेळी महाराष्ट्र राज्य मध्ये गेल्या दोन वर्षांमध्ये (विशेष करून कोरोना काळामध्ये) झालेल्या वेगवेगळ्या कामाबद्दल यामध्ये दुष्काळ मुक्त महाराष्ट्र अभियान अंतर्गत तलाव व ओढा खोलीकरण कामे, मूल्यवर्धन शिक्षण उपक्रम, बिझनेस डेव्हलपमेंट कार्यक्रम, युवती सक्षमीकरण (स्मार्ट गर्ल) यासह कोरोना काळामध्ये केलेली सर्वोच्च रक्तदान 6500 बॅग संकलन, अंदाजे 400 रुग्णांना प्लाजमा दानसाठी सहकार्य, अनेक ठिकाणी अन्नदान कार्यक्रम, अनाथ अपंग विधवा निराधार अशा 1000 कुटुंबांना घरपोच अन्नधान्य किट वाटप 7000 डबी आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप, मास्क वाटप, सॅनिटायझर वाटप, कोविंड सेंटरला मदत, रुग्णांना बॅड मिळवून देणे, रेमेडीसिवर इंजेक्शन्स मिळवून देण्यासाठी मदत, अशा प्रकारची कामे केल्यामुळे भारतीय जैन संघटनेच्या पुरस्कार वितरण सोहळा मध्ये पुणे जिल्हा ग्रामीण टीमला *उत्कृष्ट कामगिरी* हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला

अशी माहिती भारतीय जैन संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष श्री सचिन बोगावत, जिल्हा उपाध्यक्ष श्री हर्षल भटेवरा, सचिव श्री मनोज पोखरणा यांनी दिली

यासाठी श्री राजेंद्र जी सुराणा, श्रेणीक भाई शहा श्री.श्रीपाल जी ललवानी, श्री विजयजी पारख, श्री कमलेश जी गांधी यांचे मार्गदर्शन लाभले

या सर्व कामांमध्ये सर्वश्री विजय मंडलेचा, सुशील शहा, धरमचंद लोढा, प्रकाश बलदोटा, गिरीश मुनोत, हर्षद रायसोनी, दिलीप कोठारी ,तनुजा शहा ,पराग राठोड ,प्रीती शहा, रवींद्र शहा, विशाल टाटिया,निखिल चोरडिया प्रीतम गांधी, किरण    रायसोनी, पंकज दोशी, राहुल गुंदेचा, विशाल गांधी, चेतन बोरा, सुनील भटेवरा यांचा सहभाग होता

जाहिरात
Search
विडिओ
Recent News