चाकण पोलीस स्टेशन येथील अंमली पदार्थ विरोधी (एम.डी.) दाखल गुन्हयामध्ये आरोपींचे आंतरराज्यीय कनेक्शन उघड, गुजरात व मुंबई येथुन आणखी 06 आरोपींना अटक


चाकण पोलीस स्टेशन येथील अंमली पदार्थ विरोधी (एम.डी.) दाखल गुन्हयामध्ये आरोपींचे आंतरराज्यीय कनेक्शन उघड, गुजरात व मुंबई येथुन आणखी 06 आरोपींना अटक

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी : -दिनांक 7 ऑक्टोबर 2020 रोजी अमली पदार्थ विरोधी पथक, पिंपरी चिंचवड चे पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ व पथकाने चाकण पोलीस स्टेशन हद्दी मध्ये सुमारे 20 किलो एमडी मेफेड्रोन हे 20 कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करून चाकण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 1089/20 कलम 8 क सह 21 क 22 क 29 , एन डी पी एस क्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता व पाच आरोपींना यामध्ये अटक करण्यात आलेली होती. गुन्ह्याच्या तपासाची व्याप्ती पाहता पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश  यांनी श्री सुधीर हिरेमठ पोलीस उपायुक्त, गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा तपास पथकांची स्थापना केली त्यामध्ये पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, अंबरीश देशमुख, प्रशांत महाले, सागर पानमंद, पोलीस उपनिरीक्षक चामले यांची पथके स्थापन केली. या पथकाने यातील मुख्य सुत्रधार तुषार काळे व राकेश खानीवडकेर यांसह इतर 09 आरोपी यांना  गुन्हयामध्ये निष्पन्न करुन अटक केली होती तुषार काळे व राकेश खनिवडेकर यांच्याकडून अनुक्रमे 60 लाख रुपये व 25 लाख रुपये अशी एकूण 85 लाख रुपये रोख रक्कम जप्त करुन 75 लाख रुपये किंमतीची जमिन खरेदी  केल्याबाबतची दस्तऐवज जप्त करण्यात आलेला होता व ती मालमत्ता ताब्यात घेण्याची प्रक्रिया चालु केली आहे. 

गुन्हयाचे  तपासामध्ये निष्पन्न झालेले व पाहिजे असलेले आरोपी नामे परशुराम जोगल, मंदार भोसले, मनोज पालांडे व अरविंदकुमार याचा शोध घेणे कामी  तपास पथकातील सर्व अधिकारी व अंमलदार यांनी आपआपले खबरी यांना बातमी काढण्याबाबत सुचना केल्या त्यावर सपोनि श्री राम गोमारे यांना मिळालेल्या माहितीवरुन आरोपी परशुराम भालचंद्र जोगल वय 44 वर्ष रा ए-7 जेम्स हाऊस, डिसोझावाडी वागळे इस्टेट ठाणे 400604. मुळगाव जोगलवाडी, मिडबाव, देवगड जि सिंधुदुर्ग. यास दि 24/11/2020 रोजी ठाणे येथे अटक करण्यात आली. त्याचेकडे केलेल्या सखोल तपासावरुन त्याचे इतर साथिदार यांचा अधिक पुरावा मिळाला. त्यावर व पो नि श्री बाळकृष्ण सावंत यांनी व पो नि श्रीराम पोळ व तपास पथकातील इतर अधिकारी आणि पोलीस अंमलदार यांना सुचना देवुन तातडीने पाहिजे आरोपीत यांचे शोधकामी ठाणे व परिसरामध्ये रवाना केले. तेथे वपोनि श्रीराम पोळ व तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी वेशांतर करुन माहिती मिळालेपासुन 24 तासाचे आतमध्ये पाहिजे आरोपी नामे मंदार बळीराम भोसले वय 49 वर्ष रा. ओम सदगुरू अपार्टमेंट बी/28 सेक्टर नंबर -7 श्रीनगर वागळे इस्टेट ठाणे यास ठाणे येथुन तर राम मनोहरलाल गुरबानी वय 43 वर्ष रा. बी/101 ट्रुलीप सोसायटी मुलुंड कॉलनी मुलुंड वेस्ट मुंबइ यास मुलुंड येथुन  दि 25/11/2020 रोजी अटक केली. 

आरोपी नामे परशुराम जोगल, मंदार भोसले व राम मनोहरलाल गुरबानी हे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले आरोपी असून मंदार भोसले याचेवर यापूर्वी ठाणे पोलिसांनी मोका कायद्या अन्वये कारवाई केलेली आहे तर इतर आरोपी वर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत.

उर्वरीत पाहिजे आरोपी मनोज पलांडे, अरविंदकुमार व अफजल यांचे गुजरात कनेक्शन समोर आले. लागलीच वपोनि बाळकृष्ण सावंत यांनी वपोनि श्रीराम पोळ यांचे अधिपत्याखाली एक तपास पथक गुजरात येथे पाठविले. सदर तपास पथकाने गुजरात मध्ये जावुन वेशांतर करुन पाहिजे आरोपीत यांचा शोध घेतला असता आरोपी वडोदरा परिसरामध्ये लपले असल्याची माहिती मिळाली. त्यावर तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हे वेशांतर करुन सापळा लावला व आरोपी नामे 1. अरविंदकुमार प्रकाशचंद लोहरे वय 39 वर्ष रा.1002 अराधना बिल्डींग जीनके सोसायटी सीटी इंन्टरनॅशनल शाळेजवळ ओशिवरा मुंबई.मुळगाव जटनगला पो स्टे बडकेली जि मुझफरनगर उत्तरप्रदेश. 2. मनोज एकनाथ पालांडे वय 40 वर्ष रा.गणेशनगर वरसे ता रोहा जि रायगड. 3. अफजल हुसेन अब्बास सुणसरा वय 52 वर्ष रा.मोमीननगर रूम नंबर 301 मरहब्बा बिल्डींग जोगेश्वरी वेस्ट मुंबई मुळगाव मेहता ता वडगाम जि बनासकाठा उत्तर गुजरात याना पो स्टे वरणामा जी वडोदरा येथून दि 05/12/2020 रोजी दाखल गुन्हयामध्ये अटक केली आहे.आरोपीना 18/12/2020 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर झाली आहे 

  आतापर्यंत या गुन्ह्यात एकूण वीस आरोपी अटक करण्यात आलेले असुन आणखी आरोपी निष्पन्न झाले असुन त्यांचा शोध चालू आहे

गुन्ह्यातील प्रमुख सूत्रधार तुषार काळे व राकेश खानीवडेकर यांनी या गुन्ह्याचे तपासामध्ये महाड एमआयडीसी मधील अल्केमी केमिकल्स व निंबस फार्म या कंपनीमध्ये तसेच कर्जत डोंगरगाव येथील ADV जोशी यांचे फार्म हाऊस मध्ये ड्रग बनवण्याकरिता प्रशिक्षण घेतले असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झालेले आहे. सदरचे प्रशिक्षण हे मंदार भोसले, परशुराम जोगल, मनोज पांलांडे यांचे मदतीने अरविंद कुमार याने दिले असल्याचे तपासामध्ये दिसुन आले आहे. अरविंद कुमार हा MSc, ऑरगॅनिक केमिस्ट्री शिकलेला असुन तो ड्रग बनविण्यामध्ये तरबेज आहे. त्याने एम.डी. बनविण्याचे प्रशिक्षण देण्याकरिता 35 लाख रुपयांचा मोबदला घेतले असल्याबाबत तपासामध्ये समजले आहे. तसेच अरविंदकुमार याचेवर ड्रग बनविले प्रकरणी इगतपुरी, नाशिक येथे गुन्हे दाखल आसलेबाबत समोर आले आहे.

मंदार भोसले, परशुराम जोगल व मनोज पालांडे यांनी त्यासाठी आपल्या कंपनीमध्ये आरोपी तुषार काळे व राकेश खांनिवडेकर यांना जागा उपलब्ध करून देणे, कच्चामाल उपलब्ध करून देणे, कच्चा माल तसेच तयार झालेले ड्रग याची वाहतूक करून देणे व प्रशिक्षण कालावधीमध्ये तयार झालेले ड्रगची विक्री करण्याकरीता मदत केलेली आहे. मंदार भोसले याची ALKEMI इंडस्ट्री व मनोज पलांडे याची निंबस फार्मा या महाड MIDC मधील कँपण्या असून त्या ठिकाणी व कर्जत येथील ADV जोशी यांचे फार्महाऊस वर आरोपी तुषार काळे व राकेश खनिवडेकर उर्फ रॉकी यांनी ड्रग बनविणेची ट्रायल केली होती व पुढे त्या प्रशिक्षणाचे अनुभवातुन रांजणगाव एम.आय.डी.सी. येथे मोठ्या प्रमाणात सुमारे 132 किलो एम.डी. या ड्रग निर्मिती केली आहे. 

अटक केलेले आरोपी राम गुरबाणी व अफझल यांनी महाड येथे  तयार केलेले ड्रग पुढे विक्री करणे कामी मदत केली आहे. त्याबाबत पुढील तपास सुरु आहे. 

यापूर्वी अटक असलेला नायजेरियन आरोपी झुबी उडोको याने भारतात राहणे साठी आत्तापर्यंत 3 वेगवेगळे बनावट पासपोर्ट बनविले असून त्याआधारे भारतात राहून अमली पदार्थाची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले आहे बनावट पासपोर्ट व व्हिसा प्रकरणी चाकण पोलीस स्टेशन येथे गु र न 1166/2020 भारतीय दंड विधान कलम 467 468 471 420 सह परदेशी नागरिक कायदा कलम 14(अ)(ब) व पारपत्र अधि कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास करण्यात येत आहे.

आता पर्यंत च्या तपासमध्ये रांजणगाव MIDC मधील संयोग बायोटेक, महाड MIDC मधील ALKEMI INDUSTRTY व निंबस फार्मा या तीन ठिकाणी या आरोपीनि एम.डी. या ड्रग चे कोट्यवधी रुपयांचे ड्रग बनविले असल्याचे निष्पन्न झाले असून तिन्ही ठिकाणी कारवाया करण्यात आल्या आहेत. तसेच सदरच्या कंपन्या सिल करण्यात आलेल्या आहेत. 

गुन्हयाचा पुढील तपास वपोनि बाळकृष्ण सांवत, हिंजवडी पोलीस स्टेशन हे करीत असुन आरोपीत यांचेकडुन आणखीन आरोपींची नावे समोर आली असुन त्याबाबत तपास व  शोध चालु आहे. सदर तपासामध्ये विशेष सरकारी वकिल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तसचे फॉरेंसिक ऑडीटर यांचे मदतीने ड्रगच्या विक्रीतुन करण्यात आलेल्या आर्थिक उलाढालीची तपासणी करण्यात येत आहे तसेच सायबर तज्ञ यांची मदतसुध्दा घेण्यात आली आहे. 

ही कारवाई पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त श्री कृष्ण प्रकाश साहेब, अप्पर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त श्री सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री राजाराम पाटील, श्रीमती प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ, हिंजवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राम गोमारे, प्रशांत महाले, सागर पानमंद, अंबरीश देशमुख पोलीस सब इन्स्पेक्टर गिरीष चामले व पोलीस अंमलदार दत्तात्रय बनसुडे, मयुर वाडकर, स्वामिनाथ जाधव, सुनिल कानगुडे, सावन राठोड, निशांत काळे, अशिष बोटके, शकुर तांबोळी, संदिप पाटिल, अतुल लोखंडे, नागेश माळी, विठठल सानप, शैलेश मगर, अशोक गारगोटे, प्रदिप गुट्टे यांचे तपास पथक यांनी अथक परिश्रम घेऊन सदर गुन्ह्याचा तपास यशस्वीपणे केलेला आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News