महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने मौजे मुरशतपूर,ता शेवगाव येथे दिनांक ५/१२/२०२० शनिवारी जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला


महाराष्ट्र शासन कृषी  विभागाच्या वतीने मौजे मुरशतपूर,ता  शेवगाव येथे दिनांक ५/१२/२०२० शनिवारी  जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण

सदर कार्यक्रमास  श्री.करपे पी जी ,मंडळ कृषि अधिकारी चापडगाव , यांनी माती परीक्षणाचे महत्त्व सांगितले  मृदा  आरोग्य पत्रिकेचे वाचन केले गावातील शेतकरी बांधवांना मृदा आरोग्य  पत्रिके नुसार शिफारस केलेल्या  खतांच्या मात्रा कशी द्यायची, कमतरता असेल त्या घटकांचा समावेश कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले  तसेच श्री.एस ए  भागवत कृषि परीवेक्षक  चापडगाव यांनी माती परीक्षणाचे महत्त्व पटवून त्यानुसार खतांचा योग्य  वापर करून आर्थिक खर्च  कमी करण्यासाठी  व जास्तीत जास्त उत्पन्न  घेण्याबाबत  सविस्तर मार्गदर्शन केले  सदर कार्यक्रम  श्रीमती  एस बी आगळे  कृषी  सहाय्यक यांनी आयोजित केला होता तसेच शेतकरी बांधवांना पिक  फेरबदल करून तंत्रज्ञानाचा अवलंब करावा  यासाठी मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमासास  श्री मुरलीधर धावणे अध्यक्ष म्हणून लाभले  तसेच  आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणारे युवा  शेतकरी  अमोल धावणे यांनी  शेतकर्‍यांना ट्रकटरच्या सहाय्याने ऊस लागवड केली यामुळे मजुराचा होणार्‍या खर्चात काटकसर करून वेळेची बचत करता येते  याबाबत सांगितले  या कार्यक्रमास संजय धावणे,  संदिप धावणे व ईतर ग्रामस्थ उपस्थित होते 

सदर  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना श्रीमती आगळे मॅडम यांनी  केले  नंतर करपे साहेबांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करून त्यांच्या शंकांचे निरसन केले 

अशा पध्दतीने जागतिक मृदा दिन साजरा करण्यात आला

जाहिरात
Search
विडिओ
Recent News