आ,राधाकृष्ण विखे पा,यांच्या उपस्तित शिर्डीचे नुतन नगराध्यक्ष शिवाजीराजे गोंदकर यांनी स्वीकारला पदभार!


आ,राधाकृष्ण विखे पा,यांच्या उपस्तित शिर्डीचे नुतन नगराध्यक्ष शिवाजीराजे गोंदकर यांनी स्वीकारला पदभार!

शिर्डी,राजेंद्र दूनबळे ,(प्रतिनिधी) 

राज्याचे लक्ष लागलेल्या शिर्डी नगर पंचायती वर भाजपची सत्ता आल्याने शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी शिवाजीराजे गोदंकर हे बिनविरोध निवडून आले,नागरपंचत कार्यालयात आ. विखे यांच्या उपस्थितीत आपला पदभार स्वीकारला, पदभार स्वीकारल्यानंतर नगरपंचायत कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात आ. विखे यांनी त्यांचा नगराध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला, यावेळी निवडणुक निर्णय अधिकारी व तथा प्रांताधिकारी गोविंद शिंदे तसेच नगरपालिकेचे मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, राजूभाऊ गोंदकर, माजी कैलास कोते ,मंगेश त्रिभुवन, सर्व नगरसेवक, अधिकारी यांच्या उपस्थितीत नूतन नगराध्यक्ष शिवाजीराजे यांनी आपला पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा सर्व पदाधिकारी नगरसेवक यांनी अभिनंदन करत सन्मान केला ,यावेळी बोलताना विखे म्हणाले की ,अांतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र असणाऱ्या शिर्डी शहराच्या नगराध्यक्षपदी शिवाजी अमृतराव गोंदकर यांची बिनविरोध निवड झाली आहे ,सौ अनिताताई जगताप व जगन्नाथ गोंदकर यांनी आपला अर्ज ग्रामस्थांची विनंती व नगरसेवकांची विनंती मान्य करून माघारी घेतल्यानंतर ही निवड झाली आहे, त्यामुळे त्यांचेही अभिनंदन व यापुढे शिवाजीराजे यांच्या माध्यमातून शिर्डीचा आणखी विकास होईल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली, तर सत्काराला उत्तर देताना नूतन नगराध्यक्ष शिवाजीराजे यांनी सांगितले की नगरसेवक ,नगरसेविका तसेच आ. विखे, सुजय विखे, राजूभाऊ गोंदकर तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर गोंदकर यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला व मला नगराध्यक्ष पदी निवड करण्यासाठी प्रयत्न केले व मला नगराध्यक्ष केले याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे ,शिर्डी शहराचा विकास करण्यासाठी मी यापुढे कटिबद्ध आहे, शिर्डीत भरपूर विकास कामे झाली आहेत जेवढे काम करावे तेवढे कमीच आहे, यापुढे आणखी विकास कामे करत राहणार ,असे ठोस आश्वासन यावेळी नूतन नगराध्यक्ष शिवाजी गोदंंकर यांनी यावेळी दिले ,यावेळी सर्व नगरसेवक ,नगरसेविका ,कार्यकर्ते पदाधिकारी, अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते,

शिर्डीकर आणि साईबाबा संस्थान हे ड्रेस कोड बाबत,निर्णय घेण्यास समर्थ आहे बाहेर गावातील मंडळीने यात ढवळा ढवळ करू नये, साई बाबाच्या मंदिराचे आपण पवित्र राखले पाहिजे ,आपली संस्कृती जपली पाहिजे   असे आ,राधाकृष्ण विखे पा म्हणाले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News