दौंड शहरात बर्निंग कारचा थरार,अर्ध्या तासानंतर आग आटोक्यात,परिसरातील नागरिक भयभीत


दौंड शहरात बर्निंग कारचा थरार,अर्ध्या तासानंतर आग आटोक्यात,परिसरातील नागरिक भयभीत

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी

प्रतिनिधी --दौंड शहरातील मुख्य बाजार पेठेतील गांधी चौक येथे एका ओमिनी कार ने अचानक पेट घेतल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली, विजेच्या खांबाच्या खाली हा थरार सुरू झाला होता,एका जागरूक नागरिकाने लाईट बोर्डात फोन करून लाईट बंद करण्यास सांगितले,रात्री 9:30 वाजताच्या सुमारास गांधी चौकात घरासमोर उभ्या असलेल्या ओमिनी गाडीने अचानक पेट घेतला,गॅसकिट असलेल्या गाडीने पेट घेतल्यामुळे परिसरात ही बातमी वाऱ्यासारखी  पसरली,गर्दी गोंधळ यामुळे महिला मुले भयभीत झाली,तेथील काही तरुणांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला परंतू आग वाढतच गेली तेव्हा  अग्नी शमन दलाची गाडी बोलवून आग आटोक्यात आणण्यात आली,भर वस्तीत कारचा बर्निंग थरार बराच वेळ चालल्यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News