ओम साई ग्रामिण शिक्षण संस्थेच्या वतीने मास्क व मिठाई वाटप ! !


ओम साई ग्रामिण शिक्षण संस्थेच्या वतीने मास्क व मिठाई वाटप ! !

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

शालेय विद्यार्थ्यांना घरपोहच मास्क व खाऊचे वाटप ! ! 

कोपरगाव -सध्या महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जोर धरला असून यांत कोपरगाव तालुक्यात देखील दिवाळीनंतर जोर वाढताना दिसत आहे.या पाश्र्वभुमीवर तालुक्यातील सर्वच  सरकारी यंत्रणा आरोग्य,महसूल, पोलिस प्रशासन हे विभाग कसोटीने आपला जीव धोक्यात घालून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे. 

  याच अनुषंगाने ओम साई ग्रामिण शिक्षण संस्थेने शहरातील विविध धार्मिक मंदिरासमोर बसलेले गोर-गरीब की ज्यांची दोन वेळच्या जेवणाची पंचाईत असते तर ते स्वतः साठी मास्क कसे खरेदी करणार याचा विचार करत शहरातील विविध धार्मिक स्थळासमोर बसलेल्या दिन-दुबळ्या नागरिकांना मास्क,चिवडा व मिठाईचे वाटप संस्थेचे संस्थापक अध्यक्ष परशराम साबळे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रत्येक लहान मोठया स्त्री -पुरुषांनी कोरोनापासून स्वतः ची काळजी कशी घ्यावी यावर साबळे यांनी प्रत्येकाला मार्गदर्शन  केले. तसेच ग्रामीण भागातील साई शक्ती इंग्लिश मीडियम स्कुल, कासली च्या सर्व विध्यार्थ्यांना व त्यांच्या परिवारातील सदस्यांना मास्क,चिवडा व मिठाई चे घरोघरी जाऊन वाटप केले. या कामी प्राचार्य विजय कापसे विजय जाधव शिक्षक विलास चव्हाण,निलेश देवकर याची मोलाची मदत मिळाली.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News