सावली दिव्यांग संस्थेच्या वतीने प्रतिभावंत दिव्यांगांना राज्यस्तरीय दिव्यांग रत्न पुरस्कार देऊन गौरव


सावली दिव्यांग संस्थेच्या वतीने  प्रतिभावंत दिव्यांगांना राज्यस्तरीय दिव्यांग रत्न पुरस्कार देऊन गौरव

सावली दिव्यांग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या प्रतिभावंत दिव्यांग व्यक्तींना राज्यस्तरीय दिव्यांग रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी अर्थतज्ञ दत्तात्रय काटे, शेवगाव पंचायत समीती सभापती क्षितीज घुले, सावली संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे, उपाध्यक्ष चांद शेख, सचिव नवनाथ औटी, बाहुबली वायकर, सुनिल वाळके, मनोहर मराठे, खलील शेख, गणेश महाजन, सुरेखा खेडकर आदि. (छाया-वाजिद शेख-नगर)

परिस्थिती बिकट बनत असताना दिव्यांगांकडे शासनाने लक्ष देण्याची गरज -दत्तात्रय काटे

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - सावली दिव्यांग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या प्रतिभावंत दिव्यांग व्यक्तींना राज्यस्तरीय दिव्यांग रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. शहरातील हॉटेल सिंग रेसीडेन्सी येथे दिव्यांगांचा हा गौरव सोहळा पार पडला.  

जागतीक दिव्यांग दिन सप्ताह निमीत्त या दिव्यांग गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थतज्ञ दत्तात्रय काटे उपस्थित होते. दिव्यांगांचे प्रेरणास्थान असलेल्या डॉ. हेलन केलर यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शेवगाव पंचायत समीती सभापती क्षितीज घुले, सावली संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे, उपाध्यक्ष चांद शेख, सचिव नवनाथ औटी, बाहुबली वायकर, सुनिल वाळके, मनोहर मराठे, खलील शेख, गणेश महाजन आदिंसह विविध जिल्ह्यातून आलेले पुरस्कार्थी, विविध संघटनेचे पदाधिकारी व दिव्यांग बांधव उपस्थित होते. दत्तात्रय काटे म्हणाले की, अनेक दिव्यांगांनी परिस्थितीवर मात करुन विविध क्षेत्रात यशोशिखर गाठले आहे. निसर्गाने काही कमी दिले असले, तरी काही अधिक देखील दिलेले असते. आपल्यातील विशेष गुण ओळखण्याची गरज आहे. आज परिस्थिती बिकट बनत असताना, शासनाने देखील दिव्यांगांच्या प्रश्‍नाकडे लक्ष देण्याची गरज आहे. दिव्यांगांसाठी असलेल्या शासकीय योजनांचा लाभ त्यांना विना अडथळा मिळाला पाहिजे, असे सांगितले. तर गरजू घटकातील दिव्यांगांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी दिव्यांग आश्रमची गरज स्पष्ट करुन, सावली दिव्यांग संस्थेने दिव्यांगांना प्रेरणा देण्यासाठी व त्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी घेतलेला पुढाकार प्रेरणादायी असल्याचे सांगितले.

उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या प्रतिभावंत दिव्यांग व्यक्तींना राज्यस्तरीय दिव्यांग रत्न पुरस्कार सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफळ, मानचिन्ह, सन्मानपत्र देवून त्यांचा गौरव झाला. संस्थेचे उपाध्यक्ष चांद शेख यांनी सावली दिव्यांग संस्थेच्या वतीने सुरु असलेल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. प्रास्ताविकात मनोहर मराठे यांनी दिव्यांगांना प्रेरणा मिळण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुरेखा खेडकर यांनी केले. आभार संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सावली दिव्यांग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News