ज्ञानज्योती चारिटेबल वतीने कोतवाली पो स्टेचे उपनिरीक्षक सतीष शिरसाठ यांचा कोरोनायोध्दा म्हणून सन्मान


ज्ञानज्योती चारिटेबल वतीने कोतवाली पो स्टेचे उपनिरीक्षक सतीष शिरसाठ यांचा कोरोनायोध्दा म्हणून सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत)

कोरोनाच्या संकटकाळात उत्कृष्टपणे कर्तव्य बजावणारे पो. उपनिरीक्षक  सतिष शिरसाठ यांचा ज्ञानज्योती चारिटेबल  वतीने कोरोनायोध्दा म्हणून सन्मान करण्यात आला.   यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ज्ञानज्योती चारिटेबल टृस्टचे संंस्थाप अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पाटी ओबीसी चे प्रदेश चिटणीस मिलिंदभाऊ अनाप याांनी केला. यावेळी अशोक भाऊ. संदीप वाघमारे आदी उपस्थित होते.  कोरोनाच्या संकटकाळात अहमदनगर शहरा येथे कार्यरत असताना पो. उपनिरीक्षक सतीष शिरसाठ यांनी उत्तमपणे कर्तव्य बजावून अनेक गरजूंना मदत केली. अनेक वंचित घटकांना त्यांनी आधार देण्याचे कार्य केले. तसेच कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी उत्तमपणे उपाययोजना करुन कार्य केले. या कार्याची दखल घेत त्यांना कोरोनायोध्दा सन्मान प्रदान करण्यात आल्याचे ज्ञानज्योती चारिटेबल टृस्ट अध्यक्ष मिलिंदभाऊ अनाप यांनी सांगितले. शिरसाठ यांनी कर्तव्य पार पाडून सर्वसामान्यांसाठी सेवा केली असून, हा सन्मान प्रत्येक पोलीस कर्मचारी व अधिकारीचा असल्याची भावना व्यक्त केली. कोरोनाच्या संकटकाळात उत्कृष्टपणे कर्तव्य बजावणारे उपनिरीक्षक सतीष शिरसाठ वतीने कोरोनायोध्दा म्हणून सन्मान करण्यात आला. 

जाहिरात
Search
विडिओ
Recent News