घरकुल वंचितांच्या वतीने जिल्हाधिकारी भोसले यांना मानवंदना!! महापरिनिर्वाण दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन


घरकुल वंचितांच्या वतीने जिल्हाधिकारी भोसले यांना मानवंदना!! महापरिनिर्वाण दिनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

घरकुल वंचितांची घरे होण्यासाठी अ‍ॅफ्रॉर्डेबल फ्रिंज हाऊसिंग प्रकल्प राबविण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 64 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हुतात्मा स्मारक येथे घरकुल वंचितांच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तर घरकुल वंचितांची घरे होण्यासाठी अ‍ॅफ्रॉर्डेबल फ्रिंज हाऊसिंग प्रकल्प राबविण्याची मागणी करण्यात आली. घरकुल वंचितांचा प्रश्‍न आस्थेने सोडविण्यासाठी पुढाकार घेणार्‍या जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना ग्रेट लॉरिस्टर फॉर अ‍ॅफ्रॉर्डेबल फ्रिंज हाऊसिंगचा सन्मानाची मानवंदना यावेळी देण्यात आली.  याप्रसंगी अ‍ॅड. कारभारी गवळी, बाळासाहेब सुंबे, प्रकाश भंडारे, जालिंदर बोरुडे, अशोक भोसले, पोपट भोसले, योगेश वाघमारे, विठ्ठल सुरम, कुमार पवार, अंबिका जाधव, विमल सांगळे, रोहिणी पवार, हिराबाई शेकटकर, लतिका पाडळे, फरिदा शेख, अनिता वडागळे, मिरा साळवे आदिंसह घरकुल वंचित उपस्थित होते. महसुल गांव निंबळक (ता. नगर) सर्व्हे नं. 54 येथील दहा एकर जमीनीवर अ‍ॅफ्रॉर्डेबल फ्रिंज हाऊसिंग प्रकल्प राबवून 230 घरकुल वंचितांना सामाजिक न्याय मिळवून देण्याची मागणी मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना देऊन संघटनेचे अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी घरकुल वंचितांच्या प्रकल्पा संदर्भात चर्चा केली. जिल्हाधिकारी भोसले यांनी सकारात्मक भूमिका घेऊन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांना संघटनेचे शिष्टमंडळ व जिल्हा प्रशासनातील संबंधीत अधिकार्‍यांची बैठक घेण्याचे सुचना केल्या आहेत. घरकुल वंचितांचा प्रश्‍न मोठ्या आस्थेने सोडवण्यासाठी पुढाकार घेणारे जिल्हाधिकारी भोसले यांना घरकुल वंचितांच्या वतीने ग्रेट लॉरिस्टर फॉर अ‍ॅफ्रॉर्डेबल फ्रिंज हाऊसिंगचा सन्मानाची मानवंदना देण्यात आली असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले.  

अ‍ॅड. कारभारी गवळी म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कायदा हा सर्व शक्तीमान असून, समाजामध्ये क्रांतीकारक बदल घडवून आनण्याची शक्ती कायद्यात असल्याचे घटनेतून दाखवून दिले. स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतर वंचितांची प्रश्‍न सुटण्यास तयार नाही. सरकारी अधिकारी आस्थेने कामे करु लागल्यास वंचितांची प्रश्‍ने सुटणार आहे. जिल्हाधिकारी भोसले यांनी सकारात्मक निर्णय घेऊन घरकुल वंचितांच्या जीवनात आशेची किरण निर्माण केली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. घरकुल वंचित आर्थिकदृष्ट्या दुबळे आहेत. त्यांच्या सधन नातेवाईकांनी त्याचे घर होण्यासाठी आर्थिक मदत करण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. बाळासाहेब सुंबे यांनी घरकुल वंचित भगिनीला 80 हजार रुपयाची मदत दिल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान या कार्यक्रमात करण्यात आला.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News