डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती दिनी होणार पुरस्काराचे वितरण


डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने  राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन  स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती दिनी होणार पुरस्काराचे वितरण

अहमदनगर (प्रतिनिधी संजय सावंत) - स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय स्वामी विवेकानंद ज्ञान गौरव पुरस्कार, समाज गौरव व युवा गौरव तसेच राजमाता जिजाऊ पुरस्कार 2021 साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे व युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे यांनी केले आहे.

मंगळवार दि. 12 जानेवारी रोजी संस्थेच्या वतीने स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती तर राष्ट्रीय युवा सप्ताह निमगाव वाघा (ता. जि. नगर) येथे साजरा करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, धार्मिक, वैद्यकिय व पर्यावरण संवर्धनावर उत्कृष्ट कार्य करणार्‍या व्यक्ती व संस्थांना स्वामी विवेकानंद ज्ञान गौरव पुरस्कार, समाज गौरव व युवा गौरव तसेच राजमाता जिजाऊ पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी सदर क्षेत्रात कार्य करणार्‍या व्यक्तींना 25 डिसेंबर पर्यंन्त संस्थेचे कार्यालय स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, निमगाव वाघा ता. जि. अहमदनगर 414005 या पत्त्यावर पाठवावे व अधिक माहितीसाठी 9226735346 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News