संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी.
काकडी,डांगेवाडी,मल्हारवाडी, गुंजाळ वस्ती यांच्या संयुक्त विद्यमाने साईबाबा युवा चषक समिती आयोजित साईबाबा युवा चषक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून दि.५ डिसेंबर रोजी औद्योगीक व साहतीचे चेअरमन विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.
या क्रिकेट स्पर्धेमुळे परिसरातील युवकांना आपले क्रीडा कौशल्य दाखवण्याची एक उत्तम संधी उपलब्ध झाली असून टिमवर्क,खिलाडूवृत्ती,चपळता, एकसंघपना दृढ करण्यासाठी क्रीडा स्पर्धा लाभदायक असतात.
कोरोनाच्या महामारीत युवकांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत रक्तदान शिबीरे घेऊन अनेकदा आपले सामाजिक कर्तव्य आपण जपतो...अशाच वेळी आपले युवकांचेही आरोग्य सुदृढ रहावे व प्रतिकारशक्ती चांगली राहण्यासाठी शारीरिक व्यायामाची गरज आहे या उद्देशाने मैदानी स्पर्धा या शासनाच्या नियमांचे पालन करून होत आहेत हे कौतुकास्पद आहे.
युवकांच्या समवेत मी नेहमी आहे,चांगल्या उपक्रमांसाठी उपस्थित राहतांना मलाही आनंद आहे असे मनोगत विवेकभैय्या कोल्हे यांनी व्यक्त केले..!
या प्रसंगी नानासाहेब गव्हाणे,भीमराज गुंजाळ,वाल्मिक कांडेकर,अशोक गुंजाळ,विजय डांगे,दत्तात्रय गुंजाळ,अनिल शिंदे,कानिफ गुंजाळ,बाबासाहेब सोनवणे,लक्ष्मण शिंदे सर,प्रवीण सोनवणे,राजेंद्र भालेराव,नवनाथ कांडेकर,दिगंबर कांडेकर,विलास डांगे,भास्कर रानडे सर,बाळासाहेब वेताळ,श्रीकांत कांडेकर,स्वप्नील गुंजाळ,रामनाथ वेताळ,भीमसेन सोनवणे आदीं.सह युवक,खेळाडू उपस्थित होते..!!