विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:
दौंड MSEB समोर चेंबर साठी लावण्यात आलेल्या बॅरिकेटला धडकून एकजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे,मनमाड सांगली महामार्ग दौंड शहरातून जात आहे, या मार्गाची रुंदी दौंड परिसरात कमी करण्यात आली आहे,आणि रस्त्याच्या अर्धवट कामे,रस्त्याच्या दुतर्फा पडलेला राडारोडा,मधोमध असलेले सिमेंट ठोकळे त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत, पंधरा दिवसापूर्वी येथे अपघात झाला होता त्यातही दोन तरुणांचा मृत्यू झाला होता, रात्री 11:30 वाजताच्या दरम्यान हा भीषण अपघात झाल्याचे पो हवा तन्वीर सय्यद यांनी सांगितले आहे, MSEB पॉंवर हाऊस समोर चेंबर चार दिवसांपासून खोलून त्याचे काम सुरू होते रस्ता अजून पूर्ण झाला नाही तोवरच त्याची डागडुजी सुरू झाली आहे,त्याला खेटूनच वाहतूक शाखेचे बॅरिकेट लावले होते, यामध्ये ठेकेदाराने ते बॅरिकेट 500 मीटर पुढे लावणे आवश्यक होते त्याने तसे न करता एकदम चेंबर च्या जवळ लावले होते,त्यामुळे दोन दिवसांपूर्वी सुध्दा जेष्ठ नागरिक पतिपत्नी त्याला धडकून पडले होते, सुदैवाने समोरून वाहन आले नव्हते,परंतू रात्रीचा अपघात इतका भीषण होता,दोन तरुण स्कुटी गाडीवरून दौंडच्या दिशेने येत होते, चेंबर शेजारी ठेवलेले बॅरिकेट या तरुणांना दिसले नाही, आणि त्या बॅरिकेट मध्ये अडकून दोन्ही तरुण पलीकडच्या रस्त्यावर उडून पडले,आणि समोरून येणाऱ्या वाहनाखाली अक्षय अनिल पांढरे वय 24 हा चिरडला गेला,हा अपघात इतका भीषण होता की त्याचे शीर धडावेगळे झाले होते आणि शाम विठ्ठल माने हा गंभीर जखमी झाला त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहे,अपघातानंतर बॅरिकेट रस्त्याच्या बाजूला काढून ठेवले आहेत,अक्षय पांढरे हा एकुलता एक मुलगा होता, त्याची आई अपंग असून वडील कृषी मार्केट कमिटी दौंड येथे हमाली करण्याचे काम करतात,गरीब कुटुंबातील एकुलता एक करता तरुण गेल्यामुळे पुढील आयुष्यात अंधार निर्माण झाला आहे, पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमृता काटे करीत आहेत.