पद आणी सत्ता या साठी काम न करता जनतेच्या न्यायासाठी काम करा ,मा. खा. प्रकाशजी आंबेडकर


पद आणी सत्ता या साठी काम न करता जनतेच्या न्यायासाठी काम करा ,मा. खा. प्रकाशजी आंबेडकर

शिर्डी,राजेंद्र दूनबळे,प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडीच्या उत्तर नगर जिल्ह्यातील अध्यक्षपदी वंचित बहुजन आघाडीचे नेते  माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी निवड केली असून विविध पद अधिकारी यांच्या नियुक्ती करत पक्षसंघटनेत चेतना निर्माण करुन भविष्यात येऊ घातलेल्या नगरपंचायत नगरपालिका व ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्यसंस्थानिवडणुकांमध्ये उमेदवार उभे करण्यासाठी सक्रीय राहण्याचे आदेश देण्यात आले आहे यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले की साखर कारखान्याच्या बालेकिल्ला असलेल्या उत्तर नगर जिल्ह्यात वंचित च्या माध्यमातून सर्व सामान्य माणसाला बरोबर घेऊन त्यांच्या न्यायहक्कासाठी लढा  एकजुटीने लढा देण्यासाठी एक विचाराने काम करा असे सांगितले


      वंचित चे नेते आंबेडकर यांनी सांगितले की केवळ पद आणी सत्ता यासाठी काम न करता जनतेला बरोबर घेऊन काम करा जनताच राजकीय सत्तेत वाटा देण्यासाठी आपल्या बरोबर राहिलं असा विश्वास व्यक्त केला उत्तर नगर जिल्ह्यात बहुजन आघाडीची वाढती ताकद पहाता संघटना मजबूत करण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत,अहमदनगर जिल्हा अध्यक्ष विशाल कोळगे, उपाध्यक्षपदी  राहता डॉ अरुण साबळे  वर्षा बाचकर राहुरी  बबलु जावळे  कोपरगाव  सुरेश जाधव अकोले  सुनिल ब्राम्हणे संचिव  सुनिल मकासरे प्रसिध्दी  मुकुंद थोरात खजिनदार  डॉ जालिंदर घोगे प्रवक्ते  डॉ सुधीर श्रीरसागर महासचिव  संघटकपदी  बानोबी शेख  तुकाराम धनवटे  प्रा दादासाहेब खांडे  राजेंद्र गायकवाड  गणीभाई इनामदार  विश्वास वैरागर  तर सल्लागार म्हणून  शरद खरात मधुकर साळवे  एकनाथ शिरसाठ  शिरीष गायकवाड  यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे  यावेळी बोलताना  विशाल कोळगे यांनी सांगितले की राहता विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करताना  पक्षाला झालेले मतदान व नगर जिल्ह्यातील बहुजन वंचित आघाडीची वाढती ताकद पहाता संघटना मजबूत करण्यासाठी धोरणात्मक पातळीवर काम केले जाणार आहे असे सांगितले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News