फुंदे कुटुंबाकडून वडिलांच्या वर्षश्राद्धला रक्तदानाचे शिबीर ठेवून अनोखा पायंडा


फुंदे कुटुंबाकडून वडिलांच्या वर्षश्राद्धला  रक्तदानाचे शिबीर ठेवून अनोखा पायंडा

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण :

सामाजिक कार्यात आघाडीवर असलेल्या येथील फुंदे परिवाराने आपल्या वडीलाच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात सुमारे ३१ जणांनी रक्तदान करून समाजापुढे अनोखा आदर्श उभा केला आहे. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वासमोर अनोखे संकट उभे राहिले आहे. रक्ताच्या तुटवड्यामुळे शासनाने रक्तदानाचा अनोखा संकल्प उभा करण्याचे आवाहन केले आहे. त्या पाश्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय फुंदे व त्यांच्या परिवाराच्या वतीने त्यांचे वडील स्व.बाळकृष्ण यशवंत फुंदे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त पार पडलेल्या रक्तदान शिबिरात त्यांच्या परिवारातील सदस्य, नातेवाईक व मित्र मंडळाने स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. कोणत्याही प्रकारचा बडेजाव न करता अत्यंत साधेपणाने पार पडलेल्या या कार्यक्रमात ह भ प संजय महाराज बिलवाल यांनी उपस्थितांचे प्रबोधन करून फुंदे परिवाराच्या या अनोख्या  उपक्रमाचे  कौतुक केले.

वर्ष श्रद्धा निमित्ताने रक्तदाना मघ्ये सहभागी झालेल्या मान्यवरांचे आभार मानले यावेळी विजय धनवडे संदीप देहाडराय रोहीत काथवटे गणेश औटी संतोंष गायकवाड पप्पू शेठ जाधव अशोक पावसे  आमोल देवढे मंदार मुळे दिपक बडे संदीप फुंदे सोमनाथ फुंदे गणेश फुंदे आसाराम सांगळे दत्तात्रय फुंदे नारायण पायगन सुभाष बडघे पप्पू महाडीक सोमनाथ तेलोरे स्नेहल फुंदे बालिका फुंदे मनीषा फुंदे आरती बडे मिराबाई कुंदे विठ्ठल फुंदे संदीप ढाकणे शिवा गजै गणेश साबळे अशोक साबळे यांनी यावेळी रक्तदान केले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News