डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अन्याय अत्याचाराच्या अंधकरातून मुक्त करणारे तेजस्वी सूर्य !! दिपकराव गायकवाड.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अन्याय अत्याचाराच्या अंधकरातून मुक्त करणारे तेजस्वी सूर्य !! दिपकराव गायकवाड.

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

कोपरगांव.तालुक्यातील जेऊर कुंभारी संजयनगर येथे महापरिनिर्वण दिनानिमित्त महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी बोलतांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती अध्यक्ष तथा आर पी आय चे प्रदेश सचिव श्री दिपक राव गायकवाड म्हणाले की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी हजारो वर्षे गुलामगिरीच्या अंधकरात गुंतलेल्या दीन दुबळ्या ,गोर गरीब जनतेला सविधनाच्या माध्यमातून समतेची व शिक्षणाची द्वारे उगडी केली.खऱ्या अर्थाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अन्याय अत्याचाराच्या अंधकरातून मुक्त करणारे न्याय व समतेचे  तेजस्वी सुर्य आहेत.यावेळी सामूहिक त्रिशरण पंचशील घेऊन बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

दरम्यान कोपरगांव शहर पोलिस ठाण्याचे चे नवनियुक्त पोलीस निरीक्षक गवळी साहेब,पोलिस कॉन्स्टेबल ससाणे व काळे यांनी भेट देऊन डॉ.बाबासाहेबांच्या स्मारकाला पुष्पहारअर्पण करून अभिवादन केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष तथा आर पी आय प्रदेश सचिव दिपक गायकवाड,स्मारक समितीचे उपाध्यक्ष बाबुराव काकडे,सनदी लेखा परिक्षक भास्कर राव वाकोदे, पोलिस पाटील बाबासाहेब गायकवाड,किसन गायकवाड,संजय भालेराव,दिलीप काकडे,बाळासाहेब पगारे,पांडू खरात,भीमा साळवे,संजय आव्हाड,प्रदिप गायकवाड,तुषार गायकवाड,सुमित पगारे,सागर गायकवाड,विशाल गायकवाड,पप्पू गायकवाड,अवि पगारे आदी उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News