शहर शिवसेना व युवासेनेचा वतीने कोपरगावात महा रक्तदान शिबिराचे आयोजन !!


शहर शिवसेना व युवासेनेचा वतीने कोपरगावात महा रक्तदान शिबिराचे आयोजन !!

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी

शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे व सन्मा.मंत्री, युवासेना प्रमुख श्री.आदित्य ठाकरे साहेब* ह्यांच्या आदेशानुसार शिवसेना  युवासेना मार्फत कोपरगांव  विधानसभा क्षेत्रातील संजीवनी ब्लड बँक येथे कोरोना संसर्गाच्या पाश्र्वभुमीवर शासनाने लागु केलेल्या सर्व नियमांचे पालन करत तातडीने पुन्हा एकदा महा रक्तदान शिबिराच आयोजन करण्यात आले होते

या शिबिरास सर्व शिवसैनिक युवासैनिकांनी तसेच नागरीकांनी  

 चांगला प्रतिसाद दिला.

माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियानामुळे सद्यस्थितीला कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी दिसत असले तरी राज्यभरात रक्तपुरवठ्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे.म्हणुन शिवसेना पक्षप्रमुख सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे व सन्मा. मंत्री, युवासेना प्रमुख श्री. आदित्य ठाकरे साहेब ह्यांच्या आदेशानुसार शिवसेना  युवासेना मार्फत कोपरगांव  विधानसभा क्षेत्रात आज या शिबिराचे आयोजन केल्याची माहीती युवासेना शहरप्रमुख नितिन गोर्डे यांनी दिली.

संजीवनी ब्लड बँकेच्या वतीने पाटील मँडम यांनी सर्व शिवसैनिक व युवासैनिक रक्तदात्यांचे आभार मानले  यावेळी  शिवसेना संपर्कप्रमुख मनोज कपोते, शिवणारायन परदेशी,मा.शहरप्रमुख सनी वाघ, ग्राहक संरक्षण कक्ष शहरप्रमुख रवि कथले,उपजिल्हाप्रमुख गणेश जाधव युवासेना शहरप्रमुख नितीश बोरुडे, युवासेना तालुकाप्रमुख सिद्धार्थ शेळके, उपशहरप्रमुख नाना जाधव, उपशहर संघटक सागर फडे, सनी काळे, वसीम चोपदार, शेखर बोरावके युवासेना उपशहरप्रमुख ऋषिकेश धुमाळ, प्रितेश जाधव, उपतालुक प्रमुख विजय भोकरे,प्रशांत बोरावके,निलेश जगदाळे, प्रसाद निकम, दीपक कराळे, सनी डिंबर,गणेश शिंदे, गणेश पाटील, ज्ञानेश्वर मगर, प्रसाद ताकवले, अभि सुरवंशी, मुनेश गुप्ता,वसीम पटेल, सिद्धार्थ खंडांगळे, सोमनाथ आहिरे, अनिल गायकवाड,शुभम लासुरे  आदी  शिवसैनिक ,युवासैनिक उपस्थित होते.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News