समाजमंदिर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा


समाजमंदिर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा

कुरकुंभ:प्रतिनिधी

कुरकुंभ (ता. दौंड)येथील समाजमंदिर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर दिन मोठया उत्साहात साजरा करतात आला. सर्वप्रथम महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पूजन करण्यात आले होते.उपस्थित सर्व मान्यवरांनी आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पफुले वाहून विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी पी. एस. आय .अमृता काटे, पोलीस अधिकारी फाळके साहेब, पोलीस कॉन्स्टेबल डी एस चांदणे, सरपंच राहूल भोसले, ग्रा. स. विजय गिरमे, बाळू हंडाळे, माजी प्रभारी सरपंच रशिद मुलाणी, आर पी आय चे कार्यकर्ते पवार आणि महिला उपस्थित होत्या.

आर पी आय अध्यक्ष नवनाथ गायकवाड यांनी सांगितले की, जो पर्यंत चंद्र व सूर्य आहेत तो पर्यंत बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव राहणार आहे.गौतम बुद्ध यांच्याशेजारी इतर कोणाचीही नसून ती केवळ आंबेडकर यांची आहे ही एक मोठी गोष्ट आहे. स्वतःसाठी तर कोणीही जगत आहे पण समाजासाठी आणि इतरांसाठी फक्त बाबासाहेब आंबेडकर हे जगणारे एकमेव आहेत.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News