मंदिरातील 22 किलो चांदी चोरणारे चोरटे जेरबंद,अमरावती ग्रामीण LCB,आणि अंजनगाव सुर्जी पोलिसांची संयुक्त धडाकेबाज कारवाई


मंदिरातील 22 किलो चांदी चोरणारे चोरटे जेरबंद,अमरावती ग्रामीण LCB,आणि अंजनगाव सुर्जी पोलिसांची संयुक्त धडाकेबाज कारवाई

विठ्ठल होले विशेष प्रतिनिधी:

अमरावती -- अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सूर्जी पोलीस स्टेशन हद्दीत जानेवारी महिन्यात मंदिरातील 22 किलो 270 ग्रॅम चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरली होती त्या अज्ञात चोरट्याला  अमरावती ग्रामीण LCB च्या पोलिसांनी अटक केली आहे,गोपाळ ज्ञानेश्वर उमक राहणार टाकर खेडा मोरे,यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती की दिनांक 28/1/2020 रोजी गुलाबबाबा मंदिरातून अज्ञात चोरट्याने चांदीची चादर,छत्री,पादुका व पत्रा असा अंदाजे 22 किलो 270 ग्रॅम वजनाचे चांदीचे साहित्य चोरून नेल्याची  तक्रार दाखल केली होती,त्यानुसार अज्ञात चोरट्या विरोधात 50/2020,भादवी कलम 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता, अमरावती पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन,अप्पर पोलीस अधीक्षक शाम घुगे यांनी सदर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशीत केले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांनी दोन पथक तयार करून रवाना केले त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी व पोलीस  उप निरीक्षक किशोर मोतींगे यांचे एक पथक तयार केले,हे दोन्ही पथक आरोपींचा आणि मालमत्तेचा शोध घेत असताना दिनांक 4/12/20 रोजी बातमी दारामार्फत पक्की खबर मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी काला आरिफ उर्फ शेख आरिफ शेख हरूण हा त्याच्या साथीदारासह दत्तघाट परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून सदर आरोपींना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता काला आरिफ उर्फ शेख आरिफ शेख हरूण वय 35 राहणार अंजनगाव सुर्जी याने गुलाब बाबा मंदिरात दोन वेळा चोरी केल्याचे कबूल केले, त्याला त्याचा साथीदार सलीम खा नईम खा वय 26 राहणार अंजनगाव सुर्जी याने एका घरात घुसून चोरी केल्याचे कबूल केले आहे,त्यांनी मंदिरातील चोरलेली चांदी 21 किलो 177 ग्रॅम किंमत अंदाजे 12,70,620 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे,सदरची कारवाई पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन,अप्पर पोलीस अधीक्षक शाम घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तपन कोल्हे,पोलीस निरीक्षक राजेश राठोड यांचे निर्देशना प्रमाणे पोलीस उपनिरीक्षक आशिष चौधरी व पथक स्थानिक गुन्हे शाखा अमरावती आणि परी पोलीस उपनिरीक्षक किशोर मोतींगे व पथक अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशन यांनी केली आहे.वरिष्ठांकडून सर्व टीमचे कौतुक होत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News