याचा अर्थ काय कोठे तरी पाणी मुरतयं,,,? खाकी वर्दीचा धाक राहिलाचं नाही...? वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणार कोण ?


याचा अर्थ काय कोठे तरी पाणी मुरतयं,,,?  खाकी वर्दीचा धाक राहिलाचं नाही...?  वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणार कोण ?

चोरी मारीचे सत्र जोमात

        पोलिस कोमात अन् गुन्हेगार जोमात 

शिरूर |प्रतिनिधी (अप्पासाहेब ढवळे)

शिरूर तालुक्यासह रांजणगाव येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील नामांकित कंपन्यांमध्ये नव्हे तर खाजगी किंवा रोजंदारी तसेच मासिक वेतनावर काम करणाऱ्या कामगाराला रात्रीच्या वेळी रांजणगाव एमआयडीसी हद्दीत कामासाठी पायी किंवा मोटार सायकलवर जात असताना आणी शिरुर शहरात मोटार सायकलच्या डिकीतून मोठ्या प्रमाणात पैसे चोरी जात असताना कळत नकळत कायदा सुव्यवस्था कोलमडी असलायाने या माजलेल्या गुन्हेगारी याला आळा घालणार कोण ? शिरुर तालुक्यासह सर्व नागरिकांची एकच संत्पत प्रतिक्रिया उमटत आहे.

      शिरुर शहरात मोठ्या प्रमाणात असे अनेक प्रकार मोटार सायकलवरुन अज्ञात व्यक्तींनी रस्त्यात अडवून फोन करण्याचे सांगुन त्याच्या जवळील मोबाईल घेऊन पोबारा केला. रस्त्याने जात असताना महिलेच्या अंगावरील चैन,मंगळसुत्र आदी अशा अनमोल वस्तु चोरी जात असताना देखिल याची नव्हे तर इतर ही माहिती फिर्यादीस जाणिवपुर्वक इतर कारणे सांगुन दिली जात नाही याचा अर्थ काय कोठे तरी पाणी मुरतयं,,,? असा सवाल पोलिस ठाण्यात तक्रार घेऊन आलेल्या फिर्यादीस व इतर नागरिकांच्या चर्चेत आल्याचे निदर्शनात येत आहे.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News