युगायुगाचा धगधगता ज्वालामुखी, करोडोंचा कैवारी,6 डीसेम्बर रोजी शांत झाला ,,,, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,


युगायुगाचा धगधगता ज्वालामुखी, करोडोंचा कैवारी,6 डीसेम्बर रोजी शांत झाला ,,,,  डॉ.बाबासाहेब आंबेडकर,

जरा शांत हो सागरा भिम माझा तेथे निजला,

महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन

सर्व व्यापी आंबेडकर,

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २ वर्षे ११ महिने व १८ दिवसांच्या अथक परिश्रमानंतर भारताला एक परिपूर्ण संविधान बहाल केले तो सोन्याचा दिवस म्हणजेच २६ नोव्हेंबर १९४९ संविधान गौरव दिन. ह्याच दिवशी भारताला लोकशाहीचा गंध मिळाला. संविधानात नागरिकांच्या मूलभूत हक्क व अधिकाराचा अंतर्भाव आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेत समाविष्ट आहे की, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, राष्ट्रीय एकता व एकात्मता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, लोकशाही, गणराज्य प्रस्थायी करायचे आहे. संविधानाचा हा निश्चय व निर्धार नागरिक कर्तव्य पार पाडल्याशिवाय पूर्णत्वास येऊ शकत नाही. बाबासाहेबांनी आपल्याला फक्त हक्कच नाही तर कर्तव्य सुद्धा दिली आहेत. स्वतंत्र भारताची सार्वभौम जगप्रसिद्ध अशी राज्यघटना लिहून त्या घटनेचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिल्पकार ठरले असून घटनेने आपणास सर्व प्रकारची ताकत दिली आहे. या घटनेच्या आधारे भारत देश कसा चालविला जातो याचे दर्शन घडते आणि म्हणून संपूर्ण देशाला मार्गदर्शन करणारी, नियंत्रित करणारी, संपूर्ण देशाचा विकास घडवून आणणारी, देशातील माणसांना माणुसकीचे, मान सन्मानाचे आणि नैतिकतेचे दर्शन घडविणारी राज्यघटना संपूर्ण जगाला आदर्शवत अशी ठरणारी, देशातील सर्व जाती, धर्म, पंथ, लिंग भेद इत्यादीपासून संरक्षण देणारी राज्यघटना बाबासाहेबांच्या हातून लिहिली गेली आहे. भारतीय राज्यघटनेमुळे भारतातील सर्व नागरिकांचे जीवन उजळून निघाले आहे, निघत आहे. घटनात्मक सर्व अधिकार संविधानामुळे आज सर्वांना मिळाले आहेत. भारतीय संविधान हे सर्व खाजगी, सार्वजनिक व मित्र क्षेत्राला मार्गदर्शन व प्रोत्साहन देणारे आहे. मुलभूत अधिकार, समानता, अनुसूचित जाती-जमाती, जनजाती, धार्मिक, अल्पसंख्याक, आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी उपाययोजना करणारे संविधान आहे. शिक्षण, आरोग्य, संरक्षण, व्यवसाय, कंपनी, विद्यापीठ, न्यायालये, संसद, संघटना इत्यादी ठिकाणी संविधानाची मार्गदर्शक तत्वे व त्यातील तरतुदीनुसार नियोजन, संघटन, नियंत्रण, संदेशवहन, प्रशासन निर्माण करणारे आपले संविधान आहे. संविधानामुळे भारतीय राज्यव्यवस्थेला सुदृढ, सक्षम, समर्थ बनवून प्रचंड ऊर्जा व शक्ती लाभली आहे. भारताचा वैधानिक, औद्योगिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक संस्कार, संस्कृती व मुल्यविषयक असा सर्वांगीण विकास गतिमानतेने होणे, भारत सर्वार्थाने स्वावलंबी बनविणे, भारतातील कुपोषण, दारिद्य्र, शोषण व विषमता नाहीशी होणे, रोजगार निर्मिती करणे, जगातील इतर देशांना प्रगतीसाठी प्रचंड मदत करण्याची क्षमता निर्माण करणे आणि भारत देश संपूर्ण जगाचा शांततामय व कल्याणकारी व विकसनशील देश बनविण्याकडे घटनात्मक तरतुदींचा विचार करुन आज संविधानाच्या तत्वावर देशाने उचललेले अत्यंत महत्त्वाचे पाऊल प्रेरक ठरत आहे. समाजाची पुनर्रचना, समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायव्यवस्था या तत्वावर व्हायला हवी. जातीभेदाचे निर्मुलन होऊन सर्वांना समान संधी मिळावी हे बाबासाहेबांचे जीवनकार्य होते. शिक्षणाची कवाडे सर्वांना खुली व्हावेत यासाठी त्याचा आटोकाट पर्यंत होता. तो आज आपणास सफल होताना दिसत आहे. समताधिष्ठीत समाजरचना स्थापन होऊन सर्वांना मानवी हक्क प्राप्त व्हावेत हे महात्मा फुलेंचे गृहीतक होते व त्यांच्या विचारांचा वारसा बाबासाहेबांनी स्वीकारुन तो समृद्धही केला. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र देतानाच जाणीवेचा विस्तव विझू देऊ नका या डॉ. बाबासाहेबांच्या शिकवणूकीचे आपण सर्वांनी पालन केले पाहिजे.

सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचे त्यांचे अलौकिक व्यक्तिमत्व होते. मानव स्वंयपूर्ण व भयमुक्त झाला पाहिजे हा त्यांचा आग्रह होता, त्यांनी दिलेल्या प्रेरणेमुळेच मानवी जीवनाला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे हे विसरता कामा नये आणि म्हणून ज्यांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. त्यांच्या त्यागाची आपण कधीच बरोबरी करु शकत नाही, त्यांच्या करुणे एवढी करुणा आपल्यात नाही व त्यांच्या पायांच्या धुळीचे सुद्धा आपणास सर येणारी नाही 

६ डिसेंबर १९५६ ची पाहाट उगवली, पण सूर्य जणू अस्ताला गेला होता, युगायुगाचा धगधगता ज्वालामुखी, करोडोंचा कैवारी, या देशाचा सच्चा देशभक्त या देशाला सोडून गेला, वाऱ्यासारखी  बातमी साऱ्या देशभर पसरली, दिनांचा वाली आता राहिला नाही, त्या दिवशी एकाही घराची चूल पेटवली गेली नाही, जी सापडेल त्या साधनांनी लोकांनी मुंबईला धाव घेतली रेल्वेमध्ये पाय ठेवायला जागा नाही अश्या स्थितीतही लोक मुंबईला येत होते, प्रत्तेक जण रडत होता, कोणी माझा बाप गेला तर कोणी माझी आई गेली म्हणून अकरंदन करत होते, अरबी समुद्राला जणू काही त्या दिवशी या निळ्या पाखरांच्या अश्रूंचाच पूर आला होता, चंदनाच्या सुगंधी लाकडांवर बाबांचा देह ठेवला गेला, बाबांच्या चितेतील एक एक ठिणगीही जणू प्रत्येकाला संदेश देत होती, की बाळांनो रडू नका, मी हा समतेचा गाडा इथवर आणला आहे याला पुढे नेता आला तर न्या पण मागे मात्र आणू नका,शिका, संघटित व्हा, अन संघर्ष करा. 

प्रज्ञेच्या महामेरूला हृदयाच्या देठापासून विनम्र अभिवादन...!

पत्रकार ,राजेंद्र दूनबळे, 

मो,9637753598

जाहिरात
Search
विडिओ
Recent News