शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीची निम्मी रक्कम रोख स्वरूपात मिळावी -अँड.नितीन पोळ


शेतकऱ्यांना शेतीमाल विक्रीची निम्मी रक्कम रोख स्वरूपात मिळावी -अँड.नितीन पोळ

संजय भारती कोपरगाव प्रतिनिधी 

शेतकऱ्यांनी धान्य व कांदे विक्री केल्यानंतर किमान निम्मी रक्कम रोख स्वरूपात द्यावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड. नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की शेतकरी तालुक्यातील ग्रामीण भागातून धान्य व कांदे बाजार समितीमध्ये विक्री साठी आणत असतो मात्र गेल्या काही दिवसांपासून सदर विक्री केलेल्या मालाची रक्कम व्यापारी ऑनलाईन पद्धतीने अगर चेक द्वारे शेतकऱ्यांना देतात मात्र सदर रक्कम खात्यावर जमा होण्यास आठ ते दहा दिवस लागतात.

शेतकरी सदर धान्य विक्री साठी ट्रॅक्टर टेम्पो आदी साधना मधून विक्री साठी आणत असतो शेतकऱ्यांनी सदर धान्य,कांदे विक्री केल्या नंतर मिळालेल्या पैश्यातून पुढील पिकाचे बी बियाणे खते आदी खरेदी करण्याचे नियोजन करत असतो या पूर्वी रोख स्वरूपात रक्कम मिळत होती त्या वेळी शेतकरी बाजार समितीच्या आजूबाजूला असणाऱ्या दुकानातून बी,बियाणे, खते व शेती उपयोगी वस्तू खरेदी करत होता त्यामुळे या भागात शेती उपयोगी वस्तूंची अनेक व्यापाऱ्यांनी मोठी गुंतवणूक करून दुकाने सुरू केली आहेत.

   मात्र सद्या शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या मालाचे पैसे ऑन लाईन व चेक द्वारे देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना गरज असताना देखील शेती उपयोगी वस्तू खरेदी करता येत नाहीत त्या मुळे या भागातील  दुकाने व व्यापारी यांना देखील मोठा आर्थीक फटका बसत आहे.

तसेच शेतकऱ्यांना बाजार समिती मध्ये धान्य व शेती माल विक्री केल्या नंतर ही साधने रिकामी घेऊन जावी लागतात व खात्यात रक्कम जमा झाल्यानंतर  पुन्हा बी बियाणे व खते विक्री करावी लागते त्या नंतर पुन्हा तो शेतकरी तालुक्यातील दुकानातून खरेदी करण्यासाठी येत नाही शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या मालाची रक्कम ऑनलाईन व चेक द्वारे दिली जात असल्याने शेतकरी, व्यापारी माल वाहतूक करणारे ट्रॅक्टर टेम्पो चालक आदींना आर्थिक  नुकसान सहन करावे लागत आहे त्या मुळे या सर्व गोष्टीचा विचार करून शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या मालाची किमान निम्मी रक्कम रोख स्वरूपात देण्यात यावी असे या पत्रकात म्हटले आहे

जाहिरात
Search
विडिओ
Recent News