अमरापुर व परिसरातील गोरगरीब कष्टकरी असंघटित बांधकाम कामगारांनी जास्तीत जास्त ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी- जनशक्ती श्रमिक संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड शिवाजीराव काकडे


अमरापुर व परिसरातील गोरगरीब कष्टकरी असंघटित बांधकाम कामगारांनी जास्तीत जास्त ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी-  जनशक्ती श्रमिक संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड शिवाजीराव काकडे

अमरापुर व परिसरातील गोरगरीब कष्टकरी असंघटित बांधकाम कामगारांनी जास्तीत जास्त ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी असे आवाहन जनशक्ती श्रमिक संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲड शिवाजीराव काकडे यांनी अमरापुर येथे केले 

शेवगाव प्रतिनिधी सज्जाद पठाण

तालुक्यातील मौजे अमरापुर येथे असंघटित बांधकाम कामगारांच्या ऑनलाईन नोंदणी कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी सुरेश नाना चौधरी, दीपक सरोदे, गणेश म्हस्के, नामदेव सुरोशे, जालिंदर वाघ, सुधाकर पोटफोडे, फारुख शेख, महादेव शिरसागर, गणेश गायकवाड, शिवाजी तांबे, संतोष कळमकर, रवींद्र साठे,  राजेंद्र मगर, ज्ञानेश्वर आवारे आदि प्रमुख उपस्थित होते. अमरापुर व परिसरातील गोरगरीब कष्टकरी बांधकाम मजूर यांनी शेवगावला येण्याजाण्याचा त्रास होऊ नये म्हणून ही सुविधा जनशक्ती श्रमिक संघाकडून करण्यात आलेली आहे. यावेळी छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदेवराव सुसे हे होते. यावेळी ॲड. काकडे म्हणाले की, बांधकाम कामगार हा रोजाने कामासाठी इतरत्र जात असतो. एक दिवस जरी त्याने कामाचा खाडा केला तर त्यांना त्याच्या रोजंदारी पासून मुकावे लागते. मग त्यांचे हे पैसे बुडू नये व त्यांना शेवगावला जा - ये करण्यासाठी पैसे खर्च होऊ नये याकरिता जनशक्ती श्रमिक संघ शेवगावकडून त्यांना ही सोय अमरापुर येथे उपलब्ध करून दिलेली आहे. दोन-तीन दिवसांमध्ये या मजुरांनी सदर योजनेचा फायदा करून घ्यावा. जे खरेखुरे बांधकाम कामगार आहेत त्यांनीच नोंदणी करावी. शासनाने अनेक सुविधा कामगारांसाठी घोषित केलेल्या आहेत परंतु या सुविधा मिळवण्यासाठी आपणास संघटित होऊन भांडावे लागणार आहे. शासनाकडे यासाठी मागणी करावी लागणार आहे. बऱ्याचशा बांधकाम कामगारांच्या मुलांचे शिष्यवृत्ती थकीत प्रकारणासाठी देखील आपण पाठपुरावा करणार आहोत. यासाठी आपण संघटित होणे गरजेचे आहे. असेही ॲड. काकडे बोलताना म्हणाले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News