शेतकऱ्यांनी शेतकरी बांधवांसाठी कांद्याचे एकात्मिक पद्धतीने खत व किड व्यवस्थापन होऊन कांदा पिकाचे भरघोस उत्पादनासाठी कांदा पिकाच्या किटचे अनावरण पाटस येथे करण्यात आले.


शेतकऱ्यांनी शेतकरी बांधवांसाठी कांद्याचे एकात्मिक पद्धतीने खत व किड व्यवस्थापन होऊन कांदा पिकाचे भरघोस उत्पादनासाठी कांदा पिकाच्या किटचे अनावरण पाटस येथे करण्यात आले.

सुरेश बागल कुरकुंभ:प्रतिनिधी:

शेतकऱ्यांनी शेतकरी बांधवांसाठी कांद्याचे एकात्मिक पद्धतीने खत व किड व्यवस्थापन होऊन कांदा पिकाचे भरघोस उत्पादनासाठी कांदा पिकाच्या किटचे अनावरण पाटस येथे करण्यात आले.

यावेळी संदीप घोले, माऊली कापसे,अभिषेक कोऱ्हाळे, माऊली आहेर,पांडुरंग भगत, महेश रुपनवर,समाधान शिंदे, विनोद शितोळे,स्वप्नील चोरमले, संतोष जगताप, महेंद्र भागवत दिनेश गायकवाड, अतुल कड ,सचिन  आवळे,धनंजय कड, राजेंद्र कासार हे उपस्थित होते.

   पाण्याची मुबलक उपलबद्धता असलेल्या ठिकाणी शेतकरी बांधवांचे कांदा व ऊस या नगदी पिकांकडे जास्त प्रमाणात ओढा असतो. त्यासाठी शेतकरी उत्पादन वाढीसाठी आयुष्याच रान करून उत्पादन वाढीसाठी झटत असतो. पण काहीवेळा सर्व गोष्टीची उपलब्धता असुनही, कष्ट करण्याची तयारी असुन जर योग्य मार्गदर्शनच्या अभावामुळे अपेक्षित उत्पादन मिळत नाही तर त्याचा हिरमोड होतो. या सर्व गोष्टींचा विचार करून दौंड व इतर तालुक्यातील एका विचाराचे शेतकरी एकत्र येऊन राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शेतकरी व ज्यांच्या नावाने कांद्याच्या  संदीप प्याज या जातीची निर्मितीचे जनक श्री संदीप घोले यांच्या नेतृत्वाखाली  MASD उद्योग समूहाची स्थापना करण्यात आली त्याला कृषि विभागाच्या आत्माचेही मार्गदर्शन मिळाले. या समूहातील सर्व शेतकरी बांधवानी आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे काहीतरी देणं लागतो या भावनेतूनच ऊस व कांदा अमृताची निर्मिती केली. २ महिन्यापूर्वी समूहाच्या माध्यमातून ऊस पिकाचे अमृत तंत्र तयार करण्यात आलेले आहे. त्याचा प्रतिसाद दोन महिन्यात इतका मिळाला की ते महाराष्ट्रासह ६ राज्यात शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे. संदीप घोले यांच्या कांदा पिकातील असलेल्या योगदानामुळे शेतकरी बांधवानी ऊस अमृतप्रमाणे कांदा पिकासाठी  कांदाअमृत  किट तयार करावे व त्याबाबत शेतकरी बांधवाना मार्गदर्शन करावे अशी मागणी येऊ लागल्याने कांदा किटची निर्मिती करण्यात आली. त्याचे आज औपचारिकरित्या अनावरण करण्यात आले. कांद्यासाठी आवश्यक असणाऱ्या काही  घटकापैकी फवारणी साठी  एक लिटर च्या 3 बॉटल आणि ड्रीप किंवा पाटपाण्यातुन  एक लिटर च्या 3 बॉटल शेतकऱ्यांना घरपोहोच मिळणार आहेत,

   यावेळी संदीप घोले यांनी उपस्थित शेतकरी बांधवाना कांदा बीजोत्पादन व कांदा पिकाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत व काढणीपश्चात घ्यावायच्या काळजीबाबत  मार्गदर्शन केले. यामध्ये बीजोत्पादन करताना परागीभवन, कांदा बी लागवड त्याचे प्रमाण, रोपे लागवड, रोपांमधील अंतर, पाणी व्यवस्थापन, बेसल डोस, सुक्ष्म अन्नद्रव्यांची मुरवत ठेऊन देण्याची पद्धत व मात्रा, कांद्याच्या संवेदनशील अवस्था याबाबत  सविस्तर मार्गदर्शन केले. आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रुपनवर यांनी समुहाने करण्यात येणाऱ्या गटशेतीबाबत मार्गदर्शन केले.त्यामध्ये गटाच्या माध्यमातून शेतीसाठी लागणाऱ्या साधनांची एकत्रित पद्धतीने खरेदी व विक्री व्यवस्था याबाबत उदाहरणासह मार्गदर्शन केले. कांदा पिकाच्या सामूहिक पद्धतीने ग्रामबिजोत्पादनाचे  फायदे त्याची विक्रीव्यवस्था, कांद्याच्या काढणीपश्चात व्यवस्थापन , प्रक्रिया याबाबत माहिती दिली. यावेळी माऊली कापसे,विनोद शितोळे, संतोष जगताप, समाधान शिंदे यांनी ऊस अमृत बाबत आलेले अनुभव विषद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश रुपनवर यांनी केले व आभार माऊली आहेर यांनी मानले.

जाहिरात
Search
विडिओ
Recent News