वाळू उपसा करणाऱ्या २७ लक्ष रुपये किंमतीच्या ३ यांत्रिक फायबर बोटी व ३ सेक्शन जप्त,


वाळू उपसा करणाऱ्या २७ लक्ष रुपये किंमतीच्या ३ यांत्रिक फायबर बोटी व ३ सेक्शन जप्त,

(श्रीगोंदा) प्रतिनिधी:अंकुश तुपे

दिनांक २ डिसेंबर रोजी पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीत कौठा गावचे शिवारात वनविभागाच्या क्षेत्रातलगत भिमा नदीच्या पात्रात काही इसम यांत्रिक फायबर बोटीच्या सहाय्याने विनापरवाना अवैध वाळुचा उपसा करीत आहेत. त्यावरुन त्यांनी पोलीस स्टेशनला सपोनि दिलीप तेजनकर, पोकॉ प्रताप देवकाते, पोकॉ प्रकाश मांडगे, पोकॉ गोकुळ इंगवले, पोकॉ कुलदिप घोळवे, पोकॉ दादासाहेब टाके, पोकॉ किरण बोराडे, पोकॉ रवि जाधव, पोकॉ अमोल आजबे, अशांना सुचना देवुन, मिळालेल्या माहीतीच्या ठिकाणी जावून खात्री करुन सदर ठिकाणी छापा टाकला व कारवाई करण्यास सांगितले.

त्यावरुन छापा टाकला असता, कौठा गावचे शिवारात भिमा नदीपात्रात बाबुराव राजु पाटोळे रा.नानवीज ता.दौंड जि.पुणे याच्या मालकीच्या दोन फायबर व दोन सेक्शन बोटी व सोनु व्यंकटेश बल्याळ रा.शालीमार चौक दौंड ता.दौंड जि.पुणे हे बोटींना डिझेल इंजिन यंत्राच्या सहाय्याने नदी पात्रात अवैध रित्या गौण खनिज वाळुचा उपसा करत असताना मिळुन आले.

छापा टाकताच फायबर बोटी व सेक्शन मधील ईसम हे नदीतील पाण्यात उड्या मारुन पळुन गेले. तिन फायबर बोटी व तिन सेक्शन असा सुमारे २७ लक्ष ( सत्ताविस लाख रुपये ) किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. सदर दोन्ही आरोपीविरुध्द श्रीगोंदा पोलीस स्टेशनला भादवि.क .३७९,५११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर गुन्ह्याचा पुढील तपास (स.पो.नि.दिलीप तेजनकर हे करीत आहेत. (पोलीस अधिक्षक) मनोज पाटील,(अप्पर पोलीस अधिक्षक) सौरभकुमार अग्रवाल,(उपविभागीय पोलीस अधिकारी) अण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे (पोलीस निरीक्षक) रामराव ढिकले, स.पो.नि. दिलीप तेजनवर , पो.कॉ. प्रताप देवकाते, पो.कॉ. प्रकाश मांडगे, पो.कॉ. संजय काळे, पो.कॉ. गोकुळ इंगवले, पो.कॉ. कुलदिप घोळवे, पो.कॉ. दादासाहेब टाके, पो.कॉ.किरण बोराडे, पो.कॉ. अमोल आजबे, पो.कॉ. रवि जाधव यांनी केली आहे.

श्रीगोंदा पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेतल्या नंतर पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी अवैध धंदे बंद करण्याचे फर्मान सोडले होते त्यानुसार ढिकले कारवाई करतील हे हेरून अवैध धंदे बंद असताना वाळू चोरी मात्र चालू होती याची माहिती मिळताच वरील कारवाई झाल्याने इतर धंदयांवर देखील कारवाई होईल अशी चर्चा आहे

दरम्यान ढिकले यांनी दारू,गुटखा,वाळू चोरी,यांना आळा घालणार असल्याचे सांगितले

जाहिरात
Search
विडिओ
Recent News